माहिती आणि प्रसारण मंत्रालय

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएमआयसी) च्या कालातीत खजिन्याचा इतिहास 15 जुलै, 2023 पासून सर्वांना अनुभवता येणार


राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय- एनएफएआय द्वारे संग्रहित आणि पुनर्संचयित चित्रपटांचे प्रदर्शन दर शनिवारी पेडर रोड येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात संध्याकाळी 4 वाजता होणार

या शनिवारी एनएमआयसी येथे गुरुदत्त यांच्या "प्यासा" या अभिजात चित्रपटाने होणार प्रारंभ

Posted On: 14 JUL 2023 4:00PM by PIB Mumbai

मुंबई, 14 जुलै 2023

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ  (एनएफडीसी) एक नवीन चित्रपटविषयक उपक्रम सुरू करत आहे. मुंबईतील पेडर रोड येथे  (एनएफडीसी-एनएफएआय) च्या सहकार्याने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफडीसी-एनएमआयसी) "एनएमआयसीच्या कालातीत खजिन्याचा इतिहास " हा एक नवीन चित्रपट उपक्रम सुरू करत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या वारशाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने एनएफडीसी-एनएमआयसी आणि एनएफडीसी-एनएफएआय यांनी एकत्रितपणे हा उपक्रम आखला आहे.

भारतीय चित्रपटांच्या इतिहासात महत्वपूर्ण स्थान असलेल्या गुरुदत्त यांच्या  "प्यासा" या अभिजात चित्रपटाच्या  प्रदर्शनासह  एनएमआयसी च्या 'कालातीत खजिन्याचा इतिहास' या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे. 1957 मध्ये प्रदर्शित झालेला, "प्यासा" हा चित्रपट एक उत्कृष्ट कलाकृती असून आकर्षक कथा आणि असामान्य अभिनयासाठी सुपरिचित आहे.  या चित्रपटात स्वत: गुरु दत्त, वहिदा रहमान, माला सिन्हा आणि जॉनी वॉकर हे कलाकार आहेत, त्यांनी  आपल्या उत्स्फूर्त अविष्कार आणि प्रतिभेने चित्रपटातील पात्रांना जिवंत केले आहे.

एनएमआयसीच्या सभागृहात दर शनिवारी संध्याकाळी 4 वाजता हे चित्रपट प्रदर्शित केले जातील ज्यामुळे चित्रपटप्रेमी  आणि रसिकांना अभिजात  चित्रपटांची जादू अनुभवण्याची संधी मिळेल.

संग्रहालयाला भेट देणाऱ्यांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर चित्रपटाचे प्रदर्शन विनामूल्य आहे. यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला चित्रपटांच्या कालातीत खजिन्याचा आस्वाद मोठ्या पडद्यावर अगदी मोफत घेता येईल.

या प्रयत्नांमधून भारतीय चित्रपटांच्या  भव्य आणि अभिजात वारशाचे संवर्धन करून ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या एन एफ डी सी च्या वचनबद्धतेचे दर्शन होते. एनएफडीसी अंतर्गत असलेल्या एनएमआयसी  आणि एनएफएआय या प्रतिष्ठित संस्था भारताच्या चित्रपट सृष्टीतील वारशाचे जतन , संवर्धन आणि त्याला चालना देण्यासाठी कार्यरत आहेत.

एनएमआयसी चा  कालातीत खजिन्याचा इतिहास हा उपक्रम दर्दी चित्रपट रसिकांना एक मंत्रमुग्ध आणि भारतीय चित्रपटांच्या सुवर्ण युगातील जादुई दुनियेचा प्रवास करण्याचा तसेच  पुन्हा एकदा भूतकाळात रमण्याचा मनमोहक अनुभव देईल. चित्रपट प्रेमी आणि रसिकांचे त्यांच्या कॅलेंडर मध्ये या तारखा  चिन्हांकित करून अभिजात चित्रपटांचा  चिरंतन आनंद पुन्हा अनुभवण्यासाठी  "एनएमआयसी चा  कालातीत खजिन्याचा इतिहास" या उपक्रमामध्ये  सहभागी होण्यासाठी स्वागत आहे.

  

S.Kane/B.Sontakke/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 (Release ID: 1939474) Visitor Counter : 105


Read this release in: English