सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (एनसीएससी) हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन महामंडळ लिमिटेड समवेत बैठक घेत,अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचा घेतला आढावा


एनसीएससीचे अध्यक्ष विजय सांपला यांनी अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या सद्यस्थितीचा आणि एचपीसीएलमधील रिक्त जागांच्या अनुशेषाचा घेतला आढावा

Posted On: 13 JUL 2023 7:40PM by PIB Mumbai

मुंबई, 13 जुलै 2023

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (एनसीएससी) आज मुंबईत, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) सोबत आढावा  बैठक घेतली. अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांच्या हितरक्षणाच्या हेतूने आणि या संघटनेत त्यांचे कल्याण सुनिश्चित व्हावे, या उद्देशाने ही बैठक घेतली गेली.

एनसीएससीचे अध्यक्ष विजय सांपला यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने, आधी ऑल इंडिया हिंदुस्थान पेट्रोलियम एससी/एसटी कर्मचारी कल्याण संघटनेसोबत बैठक घेतली. एचपीसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुष्प कुमार जोशी यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापन प्रतिनिधी देखील या बैठकीत सहभागी झाले होते. एनसीएससी चे अध्यक्ष विजय सांपला यांनी यावेळी अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या सद्यस्थितीचा आणि रिक्त जागांच्या अनुशेषाचा आढावा घेतला. त्याशिवाय, कल्याण योजनांचे कार्यान्वयन आणि तक्रार निवारण यंत्रणा यासह इतर मुद्यांवरही चर्चा केली.

यावेळी, नेहा ताकपिरे  आणि सरचिटणीस नितीन बी. वाकोडे यांनी एनसीएससीचे अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना, एचपीसीएलच्या कर्मचाऱ्यांना संस्थेत ज्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्यांची माहिती दिली.

एचपीसीएलच्या व्यवस्थापनाने प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रमात, यात परदेशी प्रशिक्षण अभियानांचाही समावेश आहे अशा सर्व ठिकाणी25 % जागा एससी/ एसटी समुदायांसाठी राखीव ठेवण्यास सांगाव्यात, अशी विनंती कर्मचारी कल्याण संघटनेच्या अधिकाऱ्यांनी एनसीएससीच्या अध्यक्षांना केली. तसेच, प्रशिक्षण मार्गदर्शन सूचनांचे तंतोतंत पालन केले जाणेही सुनिश्चित करण्याचीही विनंती केली.संघटनेला कामकाजाची व्यवस्था पुरवण्याबद्दल आणि संस्थेच्या मनुष्यबळ आणि आयआर धोरण बनवण्याच्या प्रक्रियेत संघटनेचा  सहभाग घेतला जावा, यासाठी एनसीएससीच्या अध्यक्षांनीव्यवस्थापनाशी चर्चा करावी, अशी विनंतीही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

एनसीएससीचे अध्यक्षांनी एससी कर्मचारी संघटनेचे निवेदन एचपीसीएलच्या व्यवस्थापनाला सुपूर्द केले. एचपीसीएल व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांनी निवेदनात उपस्थित केलेल्या समस्यांकडे लक्ष देण्यास आणि कारवाईचा अहवाल आयोगाला सादर करायला सांगितले.  

एनसीएससीचे शिष्टमंडळ उद्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन, अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी कंपन्यांनी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेणार आहे.

 

N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1939300) Visitor Counter : 98


Read this release in: English