ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
एफसीआयतर्फे ओएमएसएस(डी) योजनेअंतर्गत 2,89,800 टन गहू आणि 75,000 टन तांदळाचा लिलाव
11 जुलै 2023 पर्यंत ओएमएसएस(डी)च्या माध्यमातून 17,218 टन गहू साठ्याची उचल झाली आहे
Posted On:
12 JUL 2023 9:57PM by PIB Mumbai
मुंबई, 12 जुलै 2023
महागाईमुळे गहू तसेच तांदळाच्या दरावर होणारा परिणाम कमी करण्याच्या उद्देशाने यावर्षी 28 जून 2023 रोजी भारतीय अन्न महामंडळाकडील (एफसीआय) गहू आणि तांदूळ यांच्या विक्रीसाठीच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून दर बुधवारी हा लिलाव सुरु ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत गव्हाच्या लिलावाच्या 3 फेऱ्या आणि तांदळाच्या लिलावाच्या 2 फेऱ्या झाल्या आहेत. या लिलावांमध्ये, रास्त सरासरी दर्जाच्या गव्हासाठी 2,150 रुपये प्रति क्विंटल राखीव दर आणि निम राखीव सदराखालील गव्हाला 2,125रुपये प्रति क्विंटल दर तसेच पोषणयुक्त तांदळाला 3,173 रुपये प्रति क्विंटल तर सामान्य प्रतीच्या तांदळाला 3100 रुपये प्रति क्विंटल या दरांसह 2,89,800 टन गहू आणि 75,000 टन तांदूळ यांचा लिलाव करण्यात आला. त्यापैकी 68,240 टन गहू आणि 210 टन तांदूळ स्वीकारण्यात आला आहे. खुल्या बाजारातील विक्री योजनेच्या (ओएमएसएस (डी)) माध्यमातून मंगळवार, 11 जुलै 2023 पर्यंत 17,218 टन गव्हाची उचल करण्यात आली आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारीतील अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने 13 जून 2023 रोजी जारी केलेल्या पत्रकानुसार खुल्या बाजारातील विक्री योजनेच्या (ओएमएसएस (डी)) माध्यमातून गहू आणि तांदूळ यांची विक्री करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. गव्हाच्या वाढत्या किंमती नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने ओएमएसएस (डी)च्या अंतर्गत ई-लिलावाच्या माध्यमातून केंद्रीय साठ्यातून 15 लाख मेट्रिक टन गहू पीठ गिरण्या/खासगी व्यापारी/घाऊक खरेदीदार/गव्हापासून इतर उत्पादने बनवणारे उत्पादक यांच्याकडून केल्या जाणाऱ्या खरेदीकरिता खुला करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1939091)
Visitor Counter : 122