गृह मंत्रालय

भारतीय स्टेट बँकेची 80.73 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून सीबीआयने खासगी कंपनी आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवला तसेच छापासत्रे राबवली

Posted On: 10 JUL 2023 7:13PM by PIB Mumbai

मुंबई, 10 जुलै 2023

भारतीय स्टेट बँकेच्या मुंबई शाखेने मुंबईस्थित एक खासगी कंपनी, तिचे संचालक, अज्ञात सरकारी कर्मचारी आणि इतर काही व्यक्तींविरुद्ध केलेल्या तक्रारीवरून सीबीआय अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा नोंदवला आहे. या तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की सदर कर्जदार कंपनी आणि तिच्या संचालकांनी बँकेकडून अधिक प्रमाणात कर्ज मिळवण्यासाठी फेरफार केलेली स्टॉक-बुक कर्जविषयक कागदपत्रे, विक्री, उत्पन्न तसेच नफा यांच्या संदर्भातील फुगवलेले आकडे/अतिशयोक्त आर्थिक दस्तावेज सादर करून कर्ज सुविधेचा लाभ घेतला आणि कर्जाची संपूर्ण रक्कम अंतिम कारणासाठी न वापरता इतरत्र वळवली. या व्यवहारातून बँकेला सुमारे 80.73 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणात पुढील आरोपी आहेत : (i)मेसर्स पार्थ फॉईल्स (मे.पीएफपीएल) (ii) मे.पीएफपीएल चा संचालक पार्थ बिजॉय दत्त आणि (iii)अज्ञात सरकारी कर्मचारी तसेच इतर व्यक्ती

मुंबई, गाझियाबाद तसेच हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातल्या बड्डी या ठिकाणासह विविध ठिकाणी राबवलेल्या छापासत्रांमधून काही आक्षेपार्ह कागदपत्रे, संगणकाची हार्ड डिस्क, इलेक्ट्रॉनिक उपकरणे इत्यादी मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

या संदर्भातील अधिक तपशील जाणून घेण्यासाठी कृपया सीबीआयच्या संकेतस्थळावरील ईओबी, सीबीआय मुंबई मध्ये 1 जुलै 2023 या तारखेचा एफआयआर/आरसी क्र. 0682023E0009 तपासावा.

 S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1938491) Visitor Counter : 86


Read this release in: English