विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, गोवा आणि वंगबंधू शेख मुजीबुर रहमान मेरिटाइम युनिव्हर्सिटी, ढाका यांच्यात वैज्ञानिक सहकार्यासाठी सामंजस्य करार
Posted On:
07 JUL 2023 5:49PM by PIB Mumbai
गोवा, 7 जुलै 2023
सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था, गोवा आणि वंगबंधू शेख मुजीबुर रहमान मेरिटाइम युनिव्हर्सिटी, ढाका, बांगलादेश यांच्यादरम्यान आज महासागर सहकार्यासंबंधी परस्पर करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. 07 जुलै 2022 पासून पाच वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे. एनआयओचे संचालक प्रो. सुनील कुमार सिंग आणि बीएसएमआरएमयूचे रिअर अॅडमिरल मोहम्मद मूसा यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या सामंजस्य करारामुळे महासागर विज्ञानाच्या क्षेत्रातील उपक्रमांसाठी एक आराखडा तयार करणे शक्य होईल. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाच्या फायद्यासाठी संशोधन आणि विकासाच्या प्रगतीस हातभार लागेल आणि दोन्ही देशांमधील नील अर्थव्यवस्थेला (ब्लू इकॉनॉमी) मोहिमेला हातभार लागेल. याशिवाय, या सामंजस्य करारामुळे क्षमता निर्मिती आणि मनुष्यबळ विकासाच्या दृष्टीने सहकार्य बळकट होईल.

या सामंजस्य करारासाठी कॅप्टन एस. एम. मोईनोद्दीन, डीन, फॅकल्टी ऑफ अर्थ अँड ओशन सायन्स बीएसएमआरएमयू, ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाचे नौदल सल्लागार कॅप्टन जयंत महाडिक, सहयोग डेस्क (सीएसआयआर-एनआयओ) चे प्रभारी वेंकट कृष्णमूर्ती, आंतरराष्ट्रीय एस अँड टी अफेअर्स ग्रुपचे प्रमुख डॉ. नरसिंह एल. ठाकूर आणि सीएसआयआर मुख्यालयातील आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान व्यवहार संचालनालयाच्या प्रमुख शास्त्रज्ञांनी पुढाकार घेतला.
* * *
PIB Panaji | S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 1937969)
Visitor Counter : 105