दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
गोवा टपाल विभागातर्फे आसुम्ता कॉन्व्हेंट हायस्कूलच्या सहकार्याने प्रथमच विशेष टपाल तिकीटाचे अनावरण
Posted On:
07 JUL 2023 5:15PM by PIB Mumbai
गोवा, 7 जुलै 2023
गोवा टपाल विभागाने सारझोरा-चिंचोलणे येथील आसुम्ता कॉन्व्हेंट हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधून विशेष टपाल तिकीट प्रकाशित केले. गोवा टपाल विभागाचे वरिष्ठ टपाल अधीक्षक जी. एस. राणे यांनी आसुम्ता कॉन्व्हेंट हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. जेसी, माजी शिक्षक रोलांडो डी मेलो आणि गोवा फिलाटेलिक अँड न्यूमिस्मॅटिक सोसायटीचे सचिव यांच्या उपस्थितीत विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन केले.

गोवा टपाल विभागाने शाळेच्या माध्यमातून प्रथमच टपाल तिकीट प्रकाशित केले. २०१९ पासून आसुम्ता फिलाटेलिक अँड न्यूमिस्मॅटिक क्लबचे सदस्य असलेल्या या शाळेला टपाल विभागाकडे नोंदणीकृत पहिली शाळा होण्याचा मान मिळाला आहे.
आसुम्ता कॉन्व्हेंट हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना टपाल तिकिटे गोळा करण्याचा छंद जोपासण्यासाठी जी.एस. राणे यांनी प्रोत्साहन दिले आणि या अनोख्या विशेष टपाल तिकिटाचे कौतुक केले.

7 जुलै 2023 पासून एक महिन्याच्या कालावधीसाठी टपाल ग्राहक आणि फिलेटलिस्टच्या मागणीनुसार विशेष टपाल तिकीट चिंचोलणे टपाल कार्यालयात उपलब्ध असल्याचे टपाल खात्याने कळवले आहे.

* * *
PIB Panaji | S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 1937958)
Visitor Counter : 116