माहिती आणि प्रसारण मंत्रालय
गोव्याच्या केंद्रीय जनसंपर्क विभागाने, खेलो इंडियाच्या खेळाडूंसाठी कंपालच्या इनडोर स्टेडियम मध्ये आयोजित केला योगदिनाचा कार्यक्रम
प्रविष्टि तिथि:
21 JUN 2023 7:50PM by PIB Mumbai
गोवा, 21 जून 2023
गोव्याच्या केंद्रीय जनसंपर्क ब्यूरो कार्यालयाने, खेलो इंडियाच्या राज्यातील उत्कृष्टता केंद्राच्या सहकार्याने, खेलो इंडियाच्या विद्यार्थ्यांसाठी, योगदिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कंपालच्या इनडोअर स्टेडियममध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
JKR9.jpeg)
युवा अॅथलिस्ट मध्ये योगाभ्यासाचे महत्व पोहचवण्याच्या उद्देशाने आयोजित ह्या कार्यक्रमात, खेलो इंडिया विद्यार्थी उत्कृष्टता केंद्राच्या 100 उत्साही विद्यार्थ्यांनी सक्रियपणे यात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात, पारंपरिक योगासनांवर भर देण्याऱ्या अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमधे, सर्व सहभागी लोकांनी, त्यांची कौशल्ये आणि निग्रहाचा परिचय दिला. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन, विजेत्यांना बक्षिसेही देण्यात आली.
आजवर लाखो शिष्यांना योगाभ्यासाचे धडे देणारे सुप्रसिद्ध आणि अनुभवी योग गुरु सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, हा योगाभ्यास झाला. यावेळी, सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले, की योगशास्त्र ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. त्यांनी दैनंदिन योगाभ्यास करण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. योगाभ्यासामुळे आपले मन शांत राहते आणि विद्यार्थ्यांमधे आत्मविश्वास वाढतो, असेही त्यांनी सांगितले. योगामुळे होणारे फायदे, विद्यार्थ्यांच्या इतर विविध स्पर्धांमधे देखील आपली कामगिरी सुधारण्यात उपयुक्त ठरतील, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला KISCE चे संचालक सुमित मोहन, गोवा सीबीसीचे प्रसिद्धी अधिकारी रियास बाबू आणि KISCE चे समर्पित प्रशिक्षक उपस्थित होते. त्यांच्या पाठिंब्याने आणि प्रोत्साहनामुळे या कार्यक्रमात खूप मोलाची भर पडली, ज्यामुळे युवा खेळाडूंना त्यांच्या सर्वांगीण विकासाचा अविभाज्य भाग म्हणून योग स्वीकारण्यास प्रवृत्त केले जाईल.
योगाभ्यासामुळे मिळणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभांना आता जागतिक स्तरावर व्यापक मान्यता मिळाली आहे. त्याची क्षमता ओळखून, केंद्रीय दळणवळण विभाग गोवा आणि खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्र, गोवा यांनी इच्छुक खेळाडूंमध्ये योगाची संस्कृती वाढवण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे. योगाच्या सरावाला चालना देऊन, या तरुण प्रतिभांचे सर्वांगीण कल्याण आणि कार्यप्रदर्शन वाढवण्याचे त्यांचे ध्येय आहे.

गोव्यातील युवा अॅथलिस्टची क्षमता वाढवण्यासाठी खेलो इंडियाच्या उत्कृष्टता केंद्रात ह्या योगदिनाचे यशस्वी आयोजन, गोव्याच्या केंद्रीय संचार ब्यूरो आणि खेलो इंडिया केंद्राची कटिबद्धता दर्शवणारे आहे. अशा उपक्रमांद्वारे भविष्यातील पिढी अधिक निरोगी आणि संतुलित होण्याचा मार्ग मोकळा होतो, आणि देशांच्या क्रीडा क्षेत्रात ते अधिकाधिक लक्षणीय, महत्वाचे योगदान देऊ शकतात.
* * *
PIB Panaji | S.Bedekar/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1934236)
आगंतुक पटल : 102
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English