नौवहन मंत्रालय

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त जेएनपीएद्वारे विशेष कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 21 JUN 2023 6:40PM by PIB Mumbai

मुंबई, 21 जून 2023

 

भारताच्या प्रमुख बंदरांपैकी एक 'जवाहरलाल नेहरु पत्तन प्राधिकरणा'ने (जेएनपीए) बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली 21 जून 2023 रोजी 'योग सागरमाला' संकल्पने अंतर्गत आंतरराष्ट्रीय योगदिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक संतुलनाला चालना देण्याच्या उद्देशाने जेएनपीएने सर्व भागधारकांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.

संजय सेठी, आयएएस, अध्यक्ष, जेएनपीए आणि उन्मेष शरद वाघ, आयआरएस, उपाध्यक्ष, जेएनपीए यांनी सर्व विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांसमवेत योगासने केली. योगा दिवसाच्या या विशेष सोहळ्यापूर्वी विविध योगासने आणि प्रात्यक्षिक असणाऱ्या विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

जेएनपीएने पुढाकार घेत एलिफंटा लेणी या जागतिक वारसा स्थळाच्या परिसरात अनोख्या योगा सत्राचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये जेएनपीएचे कर्मचारी आणि इतर भागधारकांनी योगासने केली. या ऐतिहासिक ठिकाणी योगासने होत असल्याने प्रत्येकासाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला.

आपल्या जीवनातील योगाचे महत्त्व स्पष्ट करताना संजय सेठी, आयएएस, अध्यक्ष, जनेपप्रा, म्हणाले, “संतुलन, एकता आणि कल्याण या सद्गुणांना कायम प्रोत्साहन देणारी योगा हि प्राचीन साधना आहे. या साधनेचे महत्व प्रत्येकाला जाणवून देत त्याचा त्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम व्हावा यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचा या योगा कार्यक्रमांमागचा उद्देश आहे. या योगा साधनेमध्ये सहभागी होत त्या माध्यमातून आयुष्याचा आनंद शोधण्यासाठी आम्ही प्रत्येकाला प्रोत्साहित करत आहोत. जनेपप्रा येथे आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन करताना आम्हाला आनंद होत आहे.”

योगा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कोस्टलबर्थ येथील वार्फ परिसरात जनेपप्राच्या महिला कर्मचार्‍यांसाठी आणि जनेपप्रा टर्मिनल्स येथे ऑन-बोर्ड वेसल्सवर जेएनपीएच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील विशेष योगा सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. PSA आणि पोर्ट ऑफ अँटवर्प ब्रुग्स यांनीही आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या कार्यक्रमात भाग घेतला.

जेएनपीए सपोर्ट स्टाफ, कें.औ.सु.दलाच्या जवानांनी त्यांच्या कुटुंबियांसह आणि जेएनपीए टाउनशिपमधील शालेय विद्यार्थ्यांनी आपापल्या ठिकाणी योगासने केली, जिथे त्यांना योगाचे विविध प्रकार शिकण्याची आणि सराव करण्याची संधी मिळाली.

 

* * *

PIB Mumbai | S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1934186) Visitor Counter : 65


Read this release in: English