कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

जी-20 देशांच्या शिक्षण कार्य गटाच्या पुण्यातील चौथ्या बैठकीदरम्यान आयोजित प्रदर्शनात, एनएसडीसीने मूलभूत कौशल्ये विकसित करण्यातील आपली भूमिका केली विशद

Posted On: 18 JUN 2023 3:11PM by PIB Mumbai

 

: पुणे, 18 जून, 2023

राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, (NSDC), ही स्किल इंडिया अभियानातील एक धोरणात्मक अंमलबजावणी आणि ज्ञान भागीदार संस्था असूण, पुण्यात सुरु असलेल्या जी-20 शिक्षण कार्यगटाच्या बैठकीत त्यांची प्रदर्शक म्हणून भूमिका महत्वाची ठरते आहे. या बैठकीतील प्रदर्शनात, विद्यार्थ्यांमधे, मूलभूत कौशल्ये विकसित करण्यासह त्यांना प्रोत्साहन देण्यात, या महामंडळाची महत्वाची भूमिका विशद करण्यात आली आहे. पुण्यात होणार्‍या शिक्षण कार्यगटाच्या बैठकीचा भाग म्हणून हे बहुमाध्यम प्रदर्शन, 17 जून ते 22 जून (19 जून 2023 वगळता) दरम्यान सुरु राहणार असूण त्यात, साक्षरता आणि संख्याशास्त्र याविषयीच्या मूलभूत कौशल्याची माहिती देण्यात आली आहे.

मूलभूत कौशल्याचा विचार करायचा झाल्यास, आज वेगाने बदलत असलेल्या व्यावसायिकतेच्या पटलावर, स्वतःला सिद्ध करण्यासाठी, माणसाला आवश्यक असलेली पायाभूत कौशल्ये, कार्यक्षमता आणि क्षमता, यांचा समावेश असतो. या कौशल्याना मूलभूत कौशल्ये  असे समजले जात असून, कोणत्याही व्यक्तीला भविष्यात या मजबूत पायाच्या बळावरच पुढचे शिक्षण आणि इतर महत्वाची कौशल्ये शिकता येतात. आता जसे, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या बदलामुळे, मूलभूत कौशल्ये शिकणे अधिक महत्वाचे झाले असून, जगाच्या बदलत असलेल्या परिस्थितीत, तेच आपल्या योग्य दिशादर्शन करू शकतात.

काय शिकायचे आहे, हे समजून घेत विद्यार्थी आपले नवनवे तंत्रज्ञान आणि कामाच्या ठिकाणांच्या परिस्थितीनुसार संशोधन आणि अध्ययन करु शकतात.

एनएसडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि  एनएसडीसी इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक वेद मणि तिवारी यांनी या संदर्भात आपले विचार मांडतांना सांगितले मूलभूत साक्षरता आणि संख्यशास्त्र भक्कम असले, तर ते प्रत्येक पायाभूत क्षेत्रासाठी एक मजबूत पाया ठरू शकतील. यातून जो पाया पक्का होतो, त्याच्या आधारे आपण  विविध कौशल्ये निर्माण करु शकतो. आजच्या जगात या मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राचे महत्व लक्षात घेत, आम्ही, एनएसडीसी इथे, त्याला आमच्या कौशल्यविषयक उपक्रमांमध्ये समाविष्ट केले आहे. मूलभूत आणि भविष्यासाठी आवश्यक अशा दोन्ही प्रकारच्या कौशल्यांचा हा संगम, भारताच्या कार्यशक्तीला सक्षम करत, त्यांना अचूक दिशादर्शन करणारा आणि वैविध्य तसेच आत्मविश्वासासह जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्यास उपयुक्त ठरेल.

एनएसडीसी, ही उद्योगाच्या गरजा आणि कार्यशक्तीची कौशल्ये यातील तफावत दूर करणारी संघटना आहे. या संघटनेने, भारतातील सुप्त कार्य शक्तीला प्रोत्साहन देण्यात आणि त्यांची मूलभूत कौशल्ये विकसित करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. एनएसडीसी चा  विविध क्षेत्रातील कौशल्ये विकासावर प्राथमिक भर आहे.

मूलभूत प्रशिक्षणाला पूरक महत्त्वाचा घटक म्हणून व्यावसायिक शिक्षणाकडे पाहिले पाहिजे. कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये मूलभूत कौशल्ये अंतर्भूत करून राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ केवळ शिकण्याचा अनुभवच द्विगुणित करत नाही तर भारतातील तरुणांसाठी संधींचे जग देखील खुले करते. कार्यस्थळावरील   सतत बदलणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लवचिक आणि अनुकूल मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने हे एकत्रीकरण व्यक्तींना प्रभावीपणे संवाद साधण्यास, जटिल माहिती समजून घेण्यासाठी  आणि वास्तविक जगाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सक्षम करते .

अशा बदलांच्या संदर्भात, प्रारंभिक जीवनातील शिक्षणाद्वारे लोकांची  "मर्यादित " कौशल्ये यापुढे भविष्यातील कौशल्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी नसतील..त्याऐवजी, व्यक्तींना त्यांच्या जीवनात  सतत शिकण्यासाठी क्षमतांनी सुसज्ज करण्याच्या अनुषंगाने, प्रशिक्षण प्रणाली लवचिक आणि जुळवून घेणारी  असणे आवश्यक आहे . अशा प्रणालींची सुरुवात मूलभूत कौशल्ये देऊन झाली पाहिजे ,जी तरुणांना श्रमिक बाजारपेठेतील आपत्कालीन (सामाजिक, पर्यावरणीय आणि तांत्रिक) बदलांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी तयार करेल, मात्र  त्यानंतर लोक परिवर्तनीय घटकांशी जुळवून घेत राहतील हे सुनिश्चित  करण्यासाठी जीवनचक्रावरील  गतिशील शिक्षणाची सुविधा देखील देईल.अशा एकात्मिक प्रणालींनी करिअर व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी, प्रशिक्षण आणि भरतीच्या गरजा स्पष्ट करण्यासाठी आणि करिअरच्या संक्रमणांना सक्षम करण्यासाठी एक बळकट आधार म्हणून काम केले पाहिजे.

आजच्या जागतिकीकरणाच्या जगात, मिश्र अध्ययनाला एक प्रभावी शैक्षणिक मॉडेल म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. रोजगार आणि श्रमिक बाजारपेठ  वेगाने बदलत आहेत,आणि आपल्याला या कलावर लक्ष ठेवणे गरजेचे असून अपेक्षित कौशल्यासाठी  विविध दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक आहे.मिश्र अध्ययन विविध दृष्टिकोन प्रदान करते ज्याद्वारे मूलभूत कौशल्ये प्रभावीपणे  जाऊ शकतात.  मिश्र शिक्षण वैयक्तिक शिकण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यक्तिगत  शिक्षण मार्गविद्यार्थ्यांना विविध स्तरांवर पाठबळ देणासाठी शिक्षकांना विविध सूचना, विद्यार्थ्यांना स्वतः शिक्षण  घेण्यास अनुमती देणारे स्वयं-प्रगती शिक्षण आणि विद्यार्थ्यांबद्दल वास्तविक वेळेत माहिती प्रदान करणारे निरंतर प्रगती निरीक्षण प्रदान करते ज्यामुळे  शिक्षकांना तत्परतेने हस्तक्षेप करण्यासाठी माहिती आधारित पध्दती लागू करण्यासाठी सहाय्य्यकारी आहे.

***

S.Kane/R.Aghor/S.Chavan/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1933259) Visitor Counter : 161


Read this release in: English