माहिती आणि प्रसारण मंत्रालय

केंद्र सरकारच्या वतीने श्रीरामपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य (भरड धान्य) वर्ष 2023 निमित्त मल्टिमिडिया प्रदर्शन व विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 17 JUN 2023 4:13PM by PIB Mumbai

अहमदनगर, 17 जून 2023

 

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्यूरो, अहमदनगर, इंडियन रेड क्रॉस सोसायटी श्रीरामपूर आणि राज्य शासनाची विविध कार्यालये व श्रीरामपूर  नगरपरिषदच्या  संयूक्त विद्यमाने,“आंतरराष्ट्रीय योग दिन व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य (भरड धान्य) वर्ष 2023” निमित्त मल्टिमिडिया  प्रदर्शन व विशेष प्रचार कार्यक्रमाचे  आयोजन श्रीरामपूर शहरातील लोकमान्य टिळक वाचनालय व ग्रंथ संग्रहालय येथे दिनांक 19 ते 21 जून 2023 दरम्यान करण्यात आले असून हे प्रदर्शन सर्व जनतेसाठी  सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन तर  2023 हे वर्षे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणूण साजरे करण्याची घोषणा केली.

निरोगी आयूष्यासाठी निरंतर योग करने अत्यंत गरजेचे असून योग अभ्यास, विविध  योगआसनांची माहिती तसेचे या आसनांपासू मिळणारे फायदे तसेच पौष्टीक तृनधान्याचे आहारातील महत्व, या धान्यांपासून तयार करण्यात येणारे चविष्ट पदार्थ आणि विविध आजारांपासून आपला बचाव करण्यासाठी यात धान्यांमध्ये असलेल्या  सत्वगुणांची माहिती या मल्टिमीडिया  प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तृणधान्यांमध्ये ज्वारी, बाजरी,नाचणी, राळा, वरई, कोदो, कुटकी ,सावा, कूट्टु व राजगिरा या दहा धान्यांचा समावेश होतो. या  भरडधान्यांना सुपरफूड व श्री अन्न असेही म्हटले जाते.

या प्रदर्शनाच्या निमित्ताने श्रीरामपूर शहरात सांसकृतिक कार्यक्रम, निबंध, चित्रकला व रांगोळी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून २१ जून रोजी आतंरराष्ट्रीय योग दिनानिमित्त  योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक १९ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजता या तीन दिवशीय मल्टिमिडिया प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे. आमदार लहू कानडे, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्शिल सदस्या मीनाताई जगधने,  उपविभागीय अधिकारी किरन सावंत, अपर पोलीस अधिक्षक स्वाची भोर, तहसीलदार वाघचौरे, गटविकास अधिकारी प्रविण शिनारे, तालूका कृषी अधिकारी अशोक साळी, माहिती अधिकारी सुरेश पाटील, बचत गट प्रमूख गायकवाड, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे चेअरमन तथा प्राचार्य सुनिल साळवे, सामाजिक कार्यकर्ते अरुण नाईक आदी मान्यवर यावे उपस्थित राहतील अशी माहिती माहिती प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये व सहायक प्रचार अधिकारी पी. कुमार यांनी दिली.

या कार्यक्रचा लाभ सर्व जनतेनी घ्यावा असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.

 

* * *

PIB Mumbai | CBC-Ahmednagar | M.Jaybhaye/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1933044) Visitor Counter : 128


Read this release in: English