नौवहन मंत्रालय
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते गोव्यात 126 उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण
Posted On:
13 JUN 2023 4:05PM by PIB Mumbai
पणजी, 13 जून 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सहाव्या राष्ट्रीय 'रोजगार मेळाव्या' ला संबोधित केले. देशभरात 43 ठिकाणी आयोजित कार्यक्रमात एकूण 70 हजार नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आलं.
गोव्यात केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते नियुक्तपत्रं वितरीत करण्यात आली. याप्रसंगी बोलताना श्रीपाद नाईक यांनी नवनियुक्त उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. श्रीपाद नाईक म्हणाले की, पंतप्रधानांनी 10 लाख नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य होताना दिसत आहे. सरकरी नोकऱ्यांबरोबरच आज स्टार्टअप आणि विविध योजनांच्या माध्यमातून होणाऱ्या कर्जसुलभतेमुळे व्यवसाय करणे सुलभ झाले आहे. याचा देशातील युवकांना लाभ होत आहे.
गोव्यात 126 उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. यात भारतीय स्टेट बँक 64, बँक ऑफ महाराष्ट्र 14, रेल्वे 30, सीमाशुल्क 8, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग 8, केंद्रीय श्रम मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय प्रत्येकी एक अशी नियुक्तीपत्र देण्यात आली.
रोजगार मेळावा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने एक पाऊल आहे. रोजगार मेळावा रोजगार निर्मिती आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रेरक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे.
नव्याने नियुक्त केलेल्यांना iGOT कर्मयोगी पोर्टलवरील ऑनलाइन मॉड्यूल कर्मयोगी Prarambh द्वारे स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी देखील मिळत आहे, जिथे 400 हून अधिक ई-लर्निंग कोर्सेस ‘कुठेही कोणत्याही डिव्हाइसवर’ लर्निंग फॉरमॅटसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
SRT/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1931996)
Visitor Counter : 114