पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून दिव्यांगांना तीन चाकी स्कूटरचे वितरण

प्रविष्टि तिथि: 08 JUN 2023 5:09PM by PIB Mumbai

पणजी, 8 जून 2023

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज खासदारनिधीतून (MPLAD) दिव्यांग व्यक्तींना सात तीन चाकी स्कूटर सुपूर्द केल्या. या स्कूटर्समुळे दिव्यांग बांधवांचा वावर सुलभ होण्यास मदत होईल.

याप्रसंगी बोलताना श्रीपाद नाईक म्हणाले की, 2021 मध्ये तीन चाकी स्कूटरसाठी एकूण 19 अर्ज आले होते. तथापि, कोविड-19 महामारीमुळे खासदारनिधी तात्पुरता थांबवण्यात आला. सध्या अर्जांवर प्रक्रिया सुरू असून, विविध प्रकल्प आणि अर्जदारांना निधीचे वाटप करण्यात येत आहे. आज सात तीन-चाकी स्कूटरद दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी देण्यात आल्या, समाजात त्यांचा वावर सुलभ करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

श्री नाईक यांनी खासदारनिधीतून सामाजिक उत्तरदायित्वासाठी सरकारच्या बांधिलकीवर भर दिला. सर्व पात्र लाभार्थ्यांनी उपलब्ध विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

SRT/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(रिलीज़ आईडी: 1930802) आगंतुक पटल : 164
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English