नौवहन मंत्रालय

जेएनपीएच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

Posted On: 06 JUN 2023 12:20PM by PIB Mumbai

नवी मुंबई, 5 जून, 2023

भारतातील एक प्रमुख कंटेनर बंदर असलेल्या जे एन पी ए अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. वसुंधरेच्या संरक्षणासाठी जागरूकता वाढवणे आणि त्यादिशेने कृती करणे हा जागतिक कार्यक्रमाचा उद्देश आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्या पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्व ओळखून JNPA च्या वतीने यंदाही जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जाण्याच्या गरजेवर भर देत JNPA ने या महत्त्वाच्या दिवसानिमित्त अनेक उपक्रमांचे आयोजन केले. प्लॅस्टिक प्रदूषणावर तोडगा’ ही यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना आहे. या संकल्पने अंतर्गत JNPA अनेक प्रभावी उपक्रम सुरू केले.

JNPA चे अध्यक्ष संजय सेठी यांनी इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पोर्ट ऑपरेशन सेंटर (POC) येथे 100 KLD सांडपाणी

प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केले. JNPA च्या परिसरात वृक्षारोपण मोहीमही यावेळी आयोजित करण्यात आली. हिरवे आच्छादन वाढवण्यासाठी, जैवविविधता वाढवण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी HPCL च्या सहकार्याने सीताफळ, सीता, अशोक, पारिजात, कामिनी इत्यादी वनस्पतींची रोपे यावेळी लावण्यात आली.

 

 

 

***

SonalT/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1930168) Visitor Counter : 106


Read this release in: English