पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्युरो, महाराष्ट्र तर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमांची छायाचित्रांच्या माध्यमातून एक झलक

Posted On: 05 JUN 2023 8:11PM by PIB Mumbai

पुणे, 5 जून 2023

50 व्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या  केंद्रीय संचार ब्युरो , पुणे अंतर्गत कार्यरत असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांमार्फत विविध उपक्रम आणि कार्यक्रम हाती घेण्यात आले होते. यामध्ये वृक्षारोपण, कापडी पिशव्यांचे वाटप, जनजागृतीपर  भित्तिपत्रके  तयार करणे, पर्यावरण विषयक मार्गदर्शन, उपस्थितांना शपथ, सायकल रॅली इत्यादी  उपक्रमांचा समावेश होता.

नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर आणि वर्धा कार्यालयांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांची छायाचित्रांच्या माध्यमातून एक झलक

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, महाराष्ट्र येथे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षासंदर्भात भित्तिपत्रके तयार करण्यात आली.

सर्जनशीलता : वर्धा आणि नागपूर, महाराष्ट्र येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भित्तिपत्रके रंगवताना  विद्यार्थी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, महाराष्ट्र येथे परिसर स्वच्छ करताना विद्यार्थी

महाराष्ट्रातील नागपूरमध्ये पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित  लोकांनी प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरण्याची शपथ घेतली.

अहमदनगरमधील भेंडे आणि  परभणी येथील बाजारपेठेत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले

वर्धा आणि नागपूर येथील नागरिकांना मार्गदर्शन करताना तज्ज्ञ मंडळी

एकदाच  वापराच्या प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्रीय संचार ब्युरो  औरंगाबादतर्फे सायकल रॅली काढण्यात आली

बुलडाणा  , नागपूर आणि अहमदनगरच्या भेंडे गावात ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले

नागपूर आणि वर्धा येथील उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले

पीआरटीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांतून पर्यावरण रक्षणाचे धडे देण्यात आले

 N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1930059) Visitor Counter : 129


Read this release in: English