सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
2022-23 च्या राष्ट्रीय उत्पन्नाचा तात्पुरता अंदाज आणि 2022-23 च्या चौथ्या तिमाहीसाठी (जानेवारी-मार्च) सकल देशांतर्गत उत्पादनाचा त्रैमासिक अंदाज याबाबतचे निवेदन
Posted On:
31 MAY 2023 10:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मे 2023
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) पुढील निवेदनाद्वारे, स्थिर आणि वर्तमान दोन्ही किंमतींवरील सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) खर्च घटकांच्या संबंधित अंदाजांसह, 2022-23 साठी राष्ट्रीय उत्पन्नाचा तात्पुरता अंदाज (पीई) आणि 2022-23 च्या जानेवारी-मार्च तिमाहीसाठी (Q4 2022-23) सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) त्रैमासिक अंदाज जारी करत आहे.
2022-23 मध्ये स्थिर (2011-12) किमतीवर वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन 160.06 लाख कोटी राहील असा अंदाज आहे, 2021-22 च्या जीडीपी च्या पहिला सुधारित अंदाज 149.26 लाख कोटी रुपयांचा होता. 2021-22 मधील 9.1 टक्क्यांच्या तुलनेत 2022-23 मध्ये वास्तविक जीडीपी मधील वाढ 7.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
नॉमिनल जीडीपी किंवा सध्याच्या किंमतींवर आधारित जीडीपी 2021-22 मधील ₹234.71 लाख कोटींच्या तुलनेत, 2022-23 मध्ये ₹272.41 लाख कोटींची पातळी गाठण्याचा अंदाज असून, तो 16.1 टक्के दराने वृद्धी दर्शवत आहे.
पुढील निर्देशाकांचा वापर करून क्षेत्र-निहाय अंदाज एकत्रित करण्यात आले आहेत.:
(i) औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP), (ii) उपलब्ध तिमाही आर्थिक निकालांवर आधारित खासगी कॉर्पोरेट क्षेत्रातील सूचीबद्ध कंपन्यांची आर्थिक कामगिरी, (iii) 2022-23 साठी पीक उत्पादनाचा तिसरा आगाऊ अंदाज, (iv) प्रमुख पशुधन उत्पादनांचे उत्पादन, (v) मत्स्य उत्पादन, (vi) सिमेंट आणि पोलादाचे उत्पादन/वापर, (vii) रेल्वेसाठीचे निव्वळ टन किलोमीटर आणि प्रवासी किलोमीटर, (viii) नागरी विमान वाहतुकीद्वारे हाताळण्यात आलेली प्रवासी आणि माल वाहतूक, (ix) प्रमुख सागरी बंदरांवर हाताळलेली माल वाहतूक, (x) व्यावसायिक वाहनांची विक्री, (xi) बँक ठेवी आणि कर्जे, (xii) आर्थिक वर्ष 2022-23 साठी उपलब्ध असलेली केंद्र आणि राज्य सरकारांची खाती, इत्यादी. अंदाजामध्ये वापरलेल्या मुख्य निर्देशांकांच्या टक्केवारीतील बदल परिशिष्टात दिले आहेत.
2023-24 एप्रिल-जून (Q1 2023-24) या तिमाहीसाठीचे पुढील तिमाही जीडीपी अंदाज 31.08.2023 रोजी जारी केले जातील.
Annexure
Click here to see the full Press release
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1928847)
Visitor Counter : 190