संरक्षण मंत्रालय

राष्‍ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 144 व्या तुकडीचे दिमाखदार दीक्षांत संचलन

Posted On: 30 MAY 2023 2:35PM by PIB Mumbai

पुणे, 30 मे 2023

 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीए ही देशातील प्रमुख संयुक्त लष्‍करी सेवा प्रशिक्षण संस्था आहे. लष्करी नेतृत्वाचे उगमस्थान असलेले  एनडीए आपल्या स्थापनेचे 75 वे गौरव वर्ष साजरे करीत आहे. यंदा एनडीएतील 144 व्या तुकडीचे दीक्षांत संचलन म्हणजेच पासिंग आउट परेड आज झाली. 

या 144 व्या  अभ्यासक्रमाचा प्रारंभ  जून 2020 मध्ये झाला होता. तीन वर्षांचे कठोर लष्करी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आज छात्रांना एका औपचारिक कार्यक्रमात उत्तीर्ण झाल्याचे घोषित करणत आले.

या तुकडीचे आज, 30 मे 2023 रोजी खडकवासला येथे, एनडीएच्या क्षेत्रपाल संचलन मैदानावर दीक्षांत संचलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान (PVSM, UYSM, AVSM, SM, VSM) यांनी संचलनाची पाहणी केली.

या संचलनामध्ये एकूण 1175 छात्र  सहभागी झाले होते.  त्यापैकी 356 छात्र  144   तुकडीचे होते. यामध्‍ये  214 लष्‍कराचे छात्र , 36 नौदलाचे छात्र  आणि 106 हवाई दलाचे छात्र होते. यांच्याबरोबरच  19 परदेशी मित्र  देशांतील (भूतान, ताजिक्स्तिान, मालदीव, अफगाणिस्तान, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश) छांत्रांचा समावेश होता. या लष्‍करी अभ्‍यासक्रमाच्या पूर्ततेनंतर हे छात्र त्यांच्या संबंधित ‘प्री-कमिशनिंग’ प्रशिक्षण  अकादमीमध्ये जाणार  आहेत.

या तुकडीतील बीसीसी आफ्रिद अफरोज या छात्राने एकूण गुणवत्तेच्या क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल राष्ट्रपती सुवर्णपदक जिंकले. एसीसी अंशु कुमार या छात्राने गुणवत्तेच्या एकूण क्रमानुसार दुसरे स्थान पटकाविल्याने   राष्ट्रपतींचे रौप्य पदक जिंकले आणि बीसीए प्रवीण सिंग याने गुणवत्ता  क्रमानुसार तिसरे  स्थान मिळवले, त्याबद्दल त्याला  राष्ट्रपतींचे कांस्य पदक जिंकले. रोमियो स्क्वॉड्रनने प्रतिष्ठित 'चीफ ऑफ स्टाफ बॅनर' जिंकले, चॅम्पियन स्क्वाड्रन म्हणून संचलनाच्या दरम्यान पुरस्कार देण्‍यात आले.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी उत्तीर्ण छात्रांचे आणि पदक विजेत्यांचे, चॅम्पियन स्क्वाड्रन यांनी घेतलेल्या कठोर परिश्रम घेवून केलेल्या शानदार  कामगिरीबद्दल अभिनंदन केले. एनडीएचा लष्‍करी अभ्यासक्रम उत्तीर्ण करणा-या छात्रांच्या पालकांचेही त्यांनी अभिनंदन केले. या पालकांनी आपल्या मुलांना  सशस्त्र दलात सामील होण्यासाठी  प्रवृत्त करून येथे पाठवल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. छात्रांनी सेवेमध्‍ये प्रगती करताना संयुक्तपणाच्या  भावनेने लष्‍कराला  पुढे घेवून जाण्‍यासाठी सर्वांना प्रोत्साहित करावे, त्याचबरोबर लष्करामध्‍ये तंत्रज्ञानाच्या आधारे चालत असलेल्या सर्व व्यवहारांमध्‍ये क्रांतीकारी परिवर्तन घडवून आणण्‍यासाठी आपल्या कार्यकाळात जरूर भर द्यावा,” असे त्यांनी  सांगितले .

 

* * *

PIB Pune | M.Iyengar/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1928259) Visitor Counter : 154


Read this release in: English