दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
गोवा टपाल क्षेत्राच्या पोस्ट मास्टर जनरल म्हणून 1994 तुकडीच्या टपाल सेवा अधिकारी मरियम्मा थॉमस यांनी स्वीकारला पदभार
Posted On:
25 MAY 2023 5:10PM by PIB Mumbai
गोवा, 25 मे 2023
गोवा टपाल क्षेत्राच्या पोस्ट मास्टर जनरल म्हणून मरियम्मा थॉमस यांनी पदभार स्वीकारला. या क्षेत्रात गोवा राज्य आणि महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2272 टपाल कार्यालयांचा समावेश आहे.

मरियम्मा थॉमस या भारतीय टपाल सेवेच्या 1994 च्या तुकडीच्या अधिकारी आहेत आणि यापूर्वी त्यांनी कर्नाटक, केरळ, तेलंगणा, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये काम केलेले असून त्या अनुभव संपन्न आहेत. नवीन पोस्टमास्टर जनरल म्हणून, टपाल क्षेत्राच्या कामकाजावर देखरेख ठेवणे आणि त्या क्षेत्रातील लोकांना वेळेवर टपाल सेवा प्रदान करण्याची जबाबदारी पोस्ट मास्टर जनरल म्हणून मरियम्मा थॉमस यांच्यावर आहे.
* * *
PIB Panaji | N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1927232)
Visitor Counter : 93