दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

मुंबई येथे मुख्‍य टपाल कार्यालयामध्‍ये 20 जून 2023 रोजी दुपारी 3 वाजता डाक अदालतचे आयोजन

Posted On: 24 MAY 2023 4:15PM by PIB Mumbai

मुंबई, 24 मे 2023

 

सीपीएमजी म्हणजेच चीफ पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई च्यावतीने 20 जून 2023 रोजी दुपारी 3.00 वाजता   123 वी  डाक अदालत भरविण्‍यात येणार आहे.  मुंबईतील मुख्‍य टपाल  कार्यालयात म्हणजेच - अॅनेक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स, 5वा मजला, मुंबई – 400001 येथे अदालत आयोजित करण्‍यात येणार  आहे.

महाराष्ट्र आणि गोवा राज्यांशी संबंधित टपाल  सेवांसंबंधीच्या ज्या तक्रारींचे  6 आठवड्यांच्या आत निराकरण झाले नाही, त्यांची दखल  डाक अदालतमध्ये घेतली जाईल. नोंदणी नसलेले/नोंदणीकृत मेल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, बचत बँका आणि मनी ऑर्डर न मिळणे  इत्यादींसंबंधीच्या तक्रारींचा विचार डाक अदालत दरम्यान केला जाईल. तक्रारींमध्ये मूळ तक्रार ज्या अधिकार्‍यांना संबोधित करण्यात आली त्यांची नावे आणि पदनाम,  मनी ऑर्डर/बचत बँक खाती/प्रमाणपत्रे इत्यादींचा तपशील असावा.

इच्छुक ग्राहक  पोस्टल सेवांबाबत त्यांच्या  तक्रारीच्या दोन प्रती सहाय्यक संचालक पोस्टल सेवा (पीजी) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, अॅनेक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स, 4था मजला, मुंबई - 400001 यांच्याकडे 05.06.2023 पर्यंत    पाठवू शकतात.  

तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी, विभागाच्यावतीने  वेळोवेळी डाक अदालत आयोजित केले जाते.  यामध्‍ये  विभागाचे अधिकारी पीडित ग्राहकांना भेटतात, त्यांच्या तक्रारींचा तपशील गोळा करतात आणि लवकरात लवकर त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1926915) Visitor Counter : 77


Read this release in: English