संरक्षण मंत्रालय
पुनीत सागर अभियानाअंतर्गत राष्ट्रीय छात्रसेनेकडून मुंबईत समुद्र किनारा आणि पुतळ्यांची स्वछता
Posted On:
24 MAY 2023 3:42PM by PIB Mumbai
मुंबई, 24 मे 2023
राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने आज मुंबईत स्वच्छता उपक्रमा अंतर्गत गिरगाव चौपाटी येथे पुनीत सागर अभियान राबवण्यात आले. या अभियानानंतर्गत समुद्र किनारा आणि पुतळ्यांची स्वछता करण्यात आली. राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह एव्हीएसएम, व्हीएसएम यावेळी उपस्थित होते. प्लॅस्टिक कचरा कमी करण्याच्या गरजेबद्दल त्यांनी छात्रसैनिकांशी संवाद साधला. या तरुणांसाठी हा संवाद प्रेरणादायी ठरला.

गिरगाव चौपाटी येथे 24 मे रोजी सकाळी, राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांनी 250 छात्रसैनिकांसह पुनीत सागर अभियान समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रमात भाग घेतला. यावेळी लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांनी महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे अधिकारी, स्थायी प्रशिक्षक कर्मचारी आणि छात्रसैनिकांसह गिरगाव चौपाटीवर समुद्र किनाऱ्याची स्वच्छता केली. या कार्यक्रमापूर्वी शहिद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्याचीही स्वच्छता करण्यात आली.

यावेळी समुद्र किनारा स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी छात्रसैनिकांनी पथनाट्य सादर करत त्यांच्या सर्जनशील सामर्थ्याचे प्रदर्शन घडवले.
* * *
PIB Mumbai | S.Tupe/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1926900)
Visitor Counter : 125