संरक्षण मंत्रालय

ऐतिहासिक परिक्रमेनंतर परतणाऱ्या आयएनएसव्ही तारिणी मधील नाविक दलाच्या स्वागतासाठी भारतीय नौदल सज्ज


सहा सदस्यांच्या नाविक दलाच्या सन्मानार्थ आयएनएस गोव्यात मांडोवी, येथे ध्वज (फ्लॅग इन) समारंभाचे आयोजन

Posted On: 22 MAY 2023 6:17PM by PIB Mumbai

गोवा, 22 मे 2023

 

महासागर नौकानयन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवत आंतरखंडीय आणि आंतर  -महासागरीय  प्रवास यशस्वीपणे पूर्ण करून आयएनएसव्ही तारिणीमधील नाविक दल मायदेशी परतत आहे. आयएनएसव्ही तारिणीमधील  दोन महिला अधिकाऱ्यांसह  सहा सदस्यीय नाविक दलाचे  स्वागत करण्यासाठी भारतीय नौदलाने  23 मे 2023 रोजी आयएनएस  मांडोवी, गोवा येथील भारतीय नौदल नाविक प्रशिक्षण केंद्रात  (आयएनडब्ल्यूटीसी ) येथे ध्वज (फ्लॅग इन ) समारंभाचे आयोजन केले आहे. या समारंभाला केंद्रीय महिला आणि  बालविकास मंत्री   स्मृती इराणी सन्माननीय अतिथी म्हणून तर  गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार आणि भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार  राणी रामपाल देखील उपस्थित राहणार आहेत.

आयएनएसव्हीतारिणी, सात महिन्यांच्या 17,000 सागरी  मैलांच्या खडतर प्रवासानंतर, अखेर मायदेशी  परतत आहे. नाविक दलाचे  विलक्षण धैर्य, लवचिकता आणि अतूट साहस  यांचे  प्रदर्शन  या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात घडवले जाईल. नारी शक्तीचे (महिला सशक्तीकरण)  सामर्थ्य दाखवून संपूर्ण मोहिमेत सहभाग  घेतलेल्या  लेफ्टनंट कमांडर डीलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए या दोन महिला अधिकाऱ्यांची कामगिरी विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. लेफ्टनंट कमांडर डीलना आणि लेफ्टनंट कमांडर रूपा यांनी गोवा ते रिओ डी जनेरियो, केपटाऊन मार्गे आणि पुन्हा परत असा  जहाजावरून  188 दिवस प्रभावी प्रवास केला.इतर सहभागींमध्ये कॅप्टन अतुल सिन्हा, लेफ्टनंट कमांडर आशुतोष शर्मा, लेफ्टनंट अविरल केशव, कमांडर निखिल हेगडे, सीडीआर एमए झुल्फिकार, सीडीआर दिव्या पुरोहित आणि सीडीआर एसी डोक यांचा समावेश आहे.

भारतीय नौदल सक्रियपणे सागरी नौकानयनाला चालना देत आहे आणि ही मोहीम जगभरात परिभ्रमण करण्याच्या त्यांच्या मोहिमेचा एक भाग आहे. कॅप्टन दिलीप दोंदे हे  2009-2010 मध्ये ही कामगिरी करणारे  पहिले  भारतीय ठरले,  त्यानंतर सीडीआर  अभिलाष टॉमी हे दोन परिक्रमांमध्ये भाग घेणारे  पहले आशियाई कॅप्टन ठरले आहेत. नुकत्याच झालेल्या गोल्डन ग्लोब रेस 2022 मध्ये, सीडीआर अभिलाष टॉमी (निवृत्त) यांनी खडतर शर्यती दरम्यान प्रचंड आव्हानांवर मात करत दुर्लभ कामगिरी करत दुसरे स्थान पटकावले.

सहा महिला नौदल अधिकाऱ्यांनी केलेल्या 'नाविका सागर परिक्रमा'मुळे नौदलात आणि देशात सागरी  नौकानयनाची लोकप्रियता आणखी वाढली आहे.आयएनएसव्ही तारिणीचा सध्याचा प्रवास हा एकाच  महिलेला संपूर्ण जगाच्या परिभ्रमणावर पाठवण्याच्या नौदलाच्या आगामी प्रयत्नांच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

या अतुलनीय  मोहिमेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांची 24 ऑगस्ट 16 रोजी आयएनएस  मांडोवी येथे स्थापन करण्यात आलेल्या महासागर  नौकानयन केंद्र (ओएसएन ) येथे कठोर प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली.  सागरी नौकानयन उपक्रमांना  प्रोत्साहन देणे आणि उपक्रम हाती घेणे हे भारतीय  नौदल नौकानयन संघटनेच्या  (आयएनएसए ) अंतर्गत,  नवी दिल्ली स्थित महासागर नौकानयन केंद्राचे (ओएसएन) उद्दिष्ट आहे.

 

* * *

PIB Panaji | S.Bedekar/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1926413) Visitor Counter : 106


Read this release in: English