वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सिप्झ (SEEPZ) मुंबईच्या वतीने दहा दिवसीय रक्तदान शिबिराचे आयोजन
Posted On:
20 MAY 2023 2:39PM by PIB Mumbai
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारितील सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक निर्यात प्रक्रिया क्षेत्र - सिप्झ (SEEPZ) देशातून निर्यातीला चालना देण्यासाठी अनेक वर्षांपासून महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सिप्झच्या स्थापनेला 1 मे 2023 रोजी 50 वर्षे पूर्ण झाली. सिप्झच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षात अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या कार्यक्रमांपैकी रक्तदान शिबिराला सिप्झचे अधिकारी आणि युनिट धारकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
हे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या (SBTC) विनंतीला प्रतिसाद देत सिप्झ प्राधिकरण 22 मे 2023 पासून 10 दिवसीय रक्तदान मोहिमेचे आयोजन करणार आहे.
सिप्झ प्राधिकरणाकडून रक्तदात्यांना घेऊन येण्याची आणि परत सोडण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल. मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी कांजूरमार्ग स्टेशन आणि पश्चिम मार्गावरील प्रवाशांसाठी अंधेरी स्टेशनवर यासाठी वाहने उपलब्ध असतील.
यासंबंधी अधिक माहितीसाठी खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल.
राजेंद्र राणे, सीमा शुल्क अधीक्षक (प्रतिबंधक)
संपर्क क्रमांक- 9833327004
हनीश राठी, एडीसी (सुरक्षा), सिप्झ विशेष आर्थिक क्षेत्र, संपर्क क्रमांक- 7976067037.
रणजित राऊळ,मूल्यमापक, माहिती संपर्क - 9821754793
***
R.Aghor/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1925871)
Visitor Counter : 116