अणुऊर्जा विभाग
हेवी वॉटर बोर्डाने बंगळुरू स्थित मेसर्स सिग्मा अल्ड्रिच केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत ड्युटेरियम लेबल कंपाउंड्स आणि संबंधित मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीसाठी जड पाण्याच्या पुरवठ्यासाठी करार केला
Posted On:
18 MAY 2023 10:11PM by PIB Mumbai
मुंबई, 18 मे 2023
अणुऊर्जा विभागाची घटक संस्था असलेल्या हेवी वॉटर बोर्डने आज ड्युटेरियम लेबल कंपाउंड्स आणि संबंधित मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीसाठी पाच वर्षांच्या कालावधीसाठी जड पाणी पुरवठ्यासंबंधी करारावर स्वाक्षरी केली. बंगळुरूची मेसर्स सिग्मा अल्ड्रिच केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड ही मे. मर्क लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेडची उप कंपनी आहे.
या करारावर हेवी वॉटर बोर्डचे संचालक (ऑपरेशन) व्ही.व्ही.एस.ए. प्रसाद आणि मर्क लाइफ सायन्स आणि सिग्मा अल्ड्रिचचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनाथ नारायणय्या यांनी स्वाक्षरी केली.
मुंबईत अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. ए.के. मोहंती, अणू ऊर्जा विभागातील अतिरिक्त सचिव ए.आर. सुळे आणि हेवी वॉटर बोर्डचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जे. श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी झाली
ड्युटेरियम लेबल केलेल्या संयुगांचे भारतात स्थानिक पातळीवर उत्पादन केल्यास भारताच्या निर्यातीला चालना मिळेल आणि मेक इन इंडिया अभियानाअंतर्गत भारत ड्युटेरेटेड उत्पादनांच्या जागतिक पुरवठा साखळीचा भाग बनू शकेल असे अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे (AEC) अध्यक्ष डॉ.ए.के. मोहंती यांनी सांगितले. ड्युटेरेटेड उत्पादनांच्या निर्मितीसाठी भारतातील गुंतवणुकीमुळे स्थानिक रसायने आणि फार्मास्युटिकल क्षेत्राच्या वाढीच्या संदर्भात देशाला फायदा होईल; त्यामुळे उच्च मूल्याच्या उत्पादनांचा पुरवठा वाढेल, असे ते म्हणाले.
विविध क्षेत्रातील प्रयोगांसाठी ड्युटेरियम लेबल केलेल्या संयुगांची मागणी वाढत आहे, उदा. एनएमआर सॉल्व्हेंट्स, ड्युटेरेटेड औषधे/सक्रिय फार्मास्युटिकल साहित्य, ऑप्टिकल फायबर, सेमीकंडक्टर.
* * *
PIB Mumbai | S.Kakade/S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1925347)
Visitor Counter : 209