भूविज्ञान मंत्रालय
एनसीपीओआर, गोवा येथे ध्रुवीय विज्ञानावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
Posted On:
11 MAY 2023 2:44PM by PIB Mumbai
पणजी, 11 मे 2023
राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन संस्थेने ((NCPOR) 16 ते19 मे दरम्यान ध्रुवीय विज्ञानावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. परिषदेला ध्रुवीय आणि महासागर विज्ञान क्षेत्रातील विविध तज्ज्ञांची उपस्थिती असणार आहे.

एनसीपीओआरने 1981 मध्ये अंटार्क्टिक मोहीम, 2004 मध्ये दक्षिणी महासागर मोहीम, 2007 मध्ये आर्क्टिक संशोधन, 2010 मध्ये दक्षिण ध्रुव मोहीम आणि 2013 मध्ये हिमालयीन क्रायोस्फेरिक संशोधनासह ध्रुवीय संशोधन उपक्रमांसाठी पुढाकार घेतला आहे.
राष्ट्रीय परिषदेत ध्रुवीय आणि महासागर विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत. यात जागतिक हवामान प्रणालीमध्ये सागरी बर्फाचे महत्त्व अधोरेखित केले जाईल.
18-19 मे रोजी होणार्या विज्ञान परिषदेत भारतीय मान्सूनसाठी ध्रुवीय क्षेत्रांचे महत्त्व आणि ध्रुवीय अभ्यासाचे धोरणात्मक परिमाण यासह विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ध्रुवीय प्रदेश आणि सभोवतालच्या महासागरांना समर्पित असलेली एकमेव भारतीय संस्था असल्याने, अद्वितीय प्रयोगशाळा सुविधा आणि ऑपरेशनल कौशल्यासह, एनसीपीओआरची ध्रुवीय प्रदेशांसाठी महत्त्वाची भूमिका आहे.
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1923351)
Visitor Counter : 127