संरक्षण मंत्रालय
सैन्यातील जवान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे सेवा मतदार म्हणून मतदार यादीत नाव नोंदणी
Posted On:
10 MAY 2023 10:09PM by PIB Mumbai
पुणे, 10 मे 2023
फिल्ड ऍम्युनिशन डेपो, पुणे यांनी निवडणूक आयोग, मावळ यांच्या सहकार्याने 10 आणि 11 मे 2023 रोजी 'मतदार ओळख मेळावा' चे यशस्वी आयोजन केले होते जेणेकरून सैन्यदलातील जवान आणि त्यांच्या कुटुंबियांची नवे मतदार म्हणून नोंदणी करता येईल. पुणे केंद्रात नुकत्याच बदली झालेल्या व्यक्तींचा समावेश करून त्यांना सेवा मतदार म्हणून मतदान करण्याची आणि लोकशाही प्रक्रियेचा एक भाग बनण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सेवा मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लघु मतदार यादी पुनर्रचना मोहिमेअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
देहू रोडच्या स्टेशन कमांडरच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. या मोहिमेदरम्यान दर्जेदार प्रशिक्षण दिल्याबद्दल तसेच लोकांना प्रेरक व्हिडिओ आणि चित्रफितीद्वारे इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीची संकल्पना समजावून सांगितल्याबद्दल त्यांनी फील्ड अॅम्युनिशन डेपोचे कौतुक केले आणि सर्व श्रेणीतील जवानांकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून मिळालेल्या उत्साही प्रतिसादाची त्यांनी प्रशंसा केली. यामध्ये 973 व्यक्तींनी नवीन मतदार म्हणून यशस्वीरित्या नोंदणी केली आणि आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 452 मतदारांची ओळखपत्रे हस्तांतरित करण्यात आली.
M.Iyengar/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1923222)
Visitor Counter : 133