दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोवा टपाल विभागाची 21 जून रोजी 54 वी प्रादेशिक डाक अदालत

प्रविष्टि तिथि: 02 MAY 2023 5:14PM by PIB Mumbai

पणजी, 2 मे 2023

पोस्टमास्टर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांनी 21 जून रोजी 54 वी प्रादेशिक डाक अदालत आयोजित केली आहे. पोस्टमास्टर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांच्या कार्यालयात दुपारी 12:00 वाजता अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

गोवा विभागातील टपाल सेवांबाबतच्या तक्रारी, ज्यांचा सहा आठवड्यांच्या आत निपटारा झाला नाही, त्या डाक अदालतीमध्ये विचारल्या जातील. गोवा प्रादेशिक विभागात गोव्यासह महाराष्ट्र राज्यातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे.

पत्र, स्पीड पोस्ट, टपाल कार्यालयीन सेवा, बचत बँक आणि मनी ऑर्डर संबंधीच्या तक्रारींचा अदालतीमध्ये विचार केला जाईल. अर्जदारांनी ज्या अधिकार्‍यांकडे मूळ तक्रार दाखल केली, त्यासंबंधीचा तपशील सोबत आणावा. इच्छुक ग्राहकांनी टपाल सेवांबाबत आपली तक्रार यू. विजयकुमार, सचिव, डाक अदालत आणि सहायक संचालक, टपाल सेवा, पोस्टमास्टर जनरल, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी यांच्याकडे पाठवू शकतात. अर्जदारांनी 31 मे पर्यंत तक्रारी टपाल कार्यालयाकडे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

S.Thakur/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 1921416) आगंतुक पटल : 159
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English