माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पंतप्रधानांच्या ‘मन की बात’च्या 100 व्या भागाचे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मुंबईतील राजभवनमध्ये विशेष प्रसारण- एक छायाचित्र प्रवास
Posted On:
30 APR 2023 7:10PM by PIB Mumbai
मुंबई, 30 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमाचा आज 100वा भाग प्रसारित झाला.
देशातील सर्व राजभवनांमध्ये प्रसार भारती'च्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ‘मन की बात’ चे प्रसारण करण्यात आले. मुंबईतील राजभवनात राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत या 100व्या भागाचे दूरदर्शनकडून प्रसारण करण्यात आले. ‘मन की बात’ च्या यापूर्वीच्या भागांमध्ये ज्यांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला होता, त्या महाराष्ट्रातील व्यक्ती या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत पद्म पुरस्कार प्राप्त आणि प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांसोबत व्यावसायिक आणि चित्रपट उद्योगातील नामवंत देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय संचार ब्युरोच्या पुण्याच्या प्रादेशिक कार्यालयाकडून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ आणि ‘मन की बात’ या विषयांवर राजभवनाच्या हिरवळीवर छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आणि प्रकाशन विभागाकडून यावेळी पुस्तकांचा एक स्टॉल उभारण्यात आला होता. या दिमाखदार कार्यक्रमाची ही काही क्षणचित्रे-
पाहुण्यांच्या स्वागतासाठी राजभवनातील दरबार हॉलला सजावट करण्यात आली.
केंद्रीय संचार ब्युरोच्या पुण्याच्या प्रादेशिक कार्यालयाकडून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ आणि ‘मन की बात’ या विषयांवर आयोजित प्रदर्शनाचे, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी उद्घाटन केले.
प्रदर्शनाची क्षणचित्रे
सीबीसी प्रदर्शनाची पाहणी केल्यावर महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल रमेश बैस यांनी अभ्यागतांच्या पुस्तिकेत अभिप्राय लिहिला.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक(पश्चिम विभाग) मोनीदीपा मुखर्जी यांनी स्वागतपर संबोधन केले.
मुंबईत राजभवनात ‘मन की बात’च्या विशेष प्रसारणाचा प्रेक्षकांनी आनंद घेतला
मुंबईत राजभवनात ‘मन की बात’च्या विशेष प्रसारणाचा प्रेक्षकांनी आनंद घेतला
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक(पश्चिम विभाग) मोनीदीपा मुखर्जी यांनी महाराष्ट्राच्या माननीय राज्यपालांचे स्वागत केले
महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल रमेश बैस यांनी कार्यक्रमाला संबोधित केले
‘मन की बात’ च्या यापूर्वीच्या भागांमध्ये ज्यांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला होता, त्या महाराष्ट्रातील व्यक्ती या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होत्या
मुंबईत राजभवनात मन की बातच्या 100व्या भागाचे प्रक्षेपण पाहत असलेला प्रेक्षकवर्ग
पद्म पुरस्कार विजेते आणि प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांसोबत व्यावसायिक आणि चित्रपट उद्योगातील नामवंत या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या कार्यक्रमात उल्लेख केलेल्या महाराष्ट्रातील व्यक्तींसोबत महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल रमेश बैस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या कार्यक्रमात उल्लेख केलेल्या महाराष्ट्रातील व्यक्तींसोबत महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल रमेश बैस
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1920956)
Visitor Counter : 109