संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुण्यातल्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाकडून वैद्यकीय स्नातकांच्या 57 व्या तुकडीचा समावेश करण्यासाठीचा कार्यक्रम संपन्न

Posted On: 29 APR 2023 8:20PM by PIB Mumbai

पुणे, 29 एप्रिल 2023

 

पुण्यातल्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाच्या, कॅप्टन देवाशिष शर्मा कीर्ती चक्र परेड ग्राउंड वर 29 एप्रिल 2023 ला झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात 57 व्या तुकडीतल्या 121 वैद्यकीय स्नातकांना  सशस्त्र दल वैद्यकीय सेवेत रुजू करून घेण्यात आले. लेफ्टनंट जनरल दलजित सिंग, एव्हीएसएम, व्हीएसएम, पीएचएस,सशस्त्र दल वैद्यकीय सेवा महासंचालक, वरिष्ठ कर्नल कमांडट,सैन्यदल वैद्यकीय  कॉर्प्स प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी, वैद्यकीय छात्र प्रभात तिवारी यांच्या नेतृत्वाखालील कमिशनिंग परेडची पाहणी केली.

  

एमयुएचएसच्या 2022 च्या हिवाळी सत्रात एमबीबीएसच्या अंतिम परीक्षेत महाविद्यालयाचे  140 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये परदेशातल्या चार विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती लेफ्टनंट जनरल नरेंद्र कोतवाल, एसएम, व्हीएसएम,एएफएमसीचे संचालक आणि कमांडट यांनी दिली. 98 पुरुष आणि 23 महिला छात्रांचा सशस्त्र दल सेवेत समावेश करण्यात आला. 96 जणांचा लष्करात,11 जणांचा नौदलात आणि 14 जणांचा हवाई दलात समावेश करण्यात आला.

  

सेवेत रुजू करण्याच्या समारंभानंतर शैक्षणिक पारितोषिक प्रदान कार्यक्रमही झाला. वैद्यकीय छात्र साग्निक तालुकदार,  संस्थेच्या   प्रतिष्ठेच्या  ‘राष्ट्रपती सुवर्ण पदक’ आणि ‘कलिंगा चषक’ या  दोन पारितोषिकांचा मानकरी ठरला. देशातल्या  सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीत एएफएमसीने  सातत्याने आपले स्थान राखले असून सीईओवर्ल्ड मॅगेझीनच्या 2022 च्या सर्वेक्षणानुसार जगातल्या सर्वोत्कृष्ट वैद्यकीय शाळांमध्ये 37 वे स्थान प्राप्त केले आहे.नैसर्गिक आपत्ती,महामारी,जागतिक संकट आणि युद्धकाळात आपल्या सेवेद्वारे या संस्थेच्या  स्नातकानी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

   

 

* * *

PIB Pune | R.Aghor/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1920803) Visitor Counter : 126


Read this release in: English