संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोल्हापूर कार्यालयातील लष्करभर्ती कार्यालयाने 29 एप्रिल 2023 रोजी सातारा इथे आयोजित केला संवादात्मक कार्यक्रम

प्रविष्टि तिथि: 29 APR 2023 6:00PM by PIB Mumbai

पुणे, 29 एप्रिल 2023

 

क्षेत्रीय भर्ती कार्यालय (ZRO) पुणे आणि लष्करभर्ती कार्यालय, कोल्हापूर यांनी 29 एप्रिल 2023 रोजी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (YCIS), सातारा इथे भारतीय लष्करात सामील होण्यासाठी पात्र असलेल्या विभागातील इच्छुक तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी एका संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

  

या कार्यक्रमात इच्छुक उमेदवारांना www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर विशद करण्यात करण्यात आलेल्या सैन्य प्रवेशाच्या विविध पद्धती, पात्रता निकष आणि नवीन ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया तपशीलवार समजावून सांगण्यात आली. भरती प्रक्रियेत तंत्रज्ञानाची मदत घेऊन पारदर्शकता आणण्यासाठी भारतीय लष्कराने या वर्षापासून लागू केलेल्या बदलांबाबत इच्छुक उमेदवारांना माहिती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाला राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स तसेच विविध शाळा, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तंत्रनिकेतन संस्थेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  

या कार्यक्रमाला उपस्थित  असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि लष्करभरतीविषयी कुतुहल दिसून आले. संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी या विषयात अभिरुची दाखवली त्यातून भारतीय लष्करात सामील होण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली. भारतीय लष्कर नागरिकांना या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी अशा प्रकारचे संवादात्मक कार्यक्रम नियमितपणे आयोजित करते. उच्च नैतिकता आणि तत्त्वांचे यथायोग्य पालन करून न्याय्य तसेच पारदर्शक भर्ती प्रक्रिया पार पाडण्याचा भारतीय लष्कर नेहमीच प्रयत्न करते.

 

* * *

PIB Pune | R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1920776) आगंतुक पटल : 145
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English