संरक्षण मंत्रालय
अग्नी दमन-23: अग्निशमनाबाबत नागरी-लष्करी यंत्रणांचा एकत्रित सराव
Posted On:
28 APR 2023 8:19PM by PIB Mumbai
पुणे, 28 एप्रिल 2023
उन्हाळ्याची सुरुवात आणि पुणे आणि आजूबाजूच्या भागातला तापमानाचा वाढता पारा यामुळे आगीच्या धोक्याच्या घटकांमध्ये गंभीर वाढ झाली आहे. अग्निशमन विषयी जागरुकता आणि पुरुषांच्या प्रशिक्षणावर भर देण्यासाठी तसेच लष्करी आणि नागरी यासह सर्व संयुक्त यंत्रणांच्या क्षमतांचा वापर करण्यासाठी, अग्नी दमन-23 नावाचा अग्निशमन सराव 29 फील्ड अॅम्युनिशन डेपो, देहू रोड येथे 28 एप्रिल 2023 रोजी दक्षिण कमांड मुख्यालयाच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात आला.
राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), एमसी आळंदी, अग्निशमन विभाग पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए आकुर्डी, एमआयडीसी आंबी तळेगाव, एमसी तळेगाव दाभाडे, नगर परिषद चाकण, मुख्य अग्निशमन विभाग भवानी पेठ, टाटा मोटर्स लि., महिंद्रा व्हेईकल लिमिटेड आणि बजाज ऑटो यासारख्या 32 नागरी यंत्रणांसह एकूण 56 अग्निशमन यंत्रणांनी या सरावात सक्रिय सहभाग घेतला. सर्व प्रकारच्या आगीविरूद्ध जलद प्रतिसाद धोरणासह प्रात्यक्षिके आणि कार्यपद्धतींची समन्वित पद्धतीने तालीम करण्यात आली.
हा सराव म्हणजे पुण्यातील लष्करी आणि नागरी आस्थापनेसह उपलब्ध सर्व अग्निशमन संसाधने एकत्रित करण्याचा महत्त्वाचा प्रयत्न होता. अग्नी दमन-22 सरावाने केंद्रीय/राज्य संस्थांसह लढाऊ मनुष्यबळाला समन्वित अग्निशमन कार्य करण्यासाठी आणि बहुमोल जीव आणि मौल्यवान संपत्ती वाचवण्यासाठी बाधित भागात कमीतकमी शक्य वेळेत जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रेरणा आणि संधी दिली.
* * *
PIB Pune | N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1920644)
Visitor Counter : 150