विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
लंडनमध्ये भारत- इंग्लंड ( यु के) विज्ञान आणि नवोन्मेष परिषद बैठक सुरू होण्यापूर्वी केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह आणि इंग्लंडचे मंत्री जॉर्ज फ्रीमन यांची भेट
युके -भारत ‘आराखडा 2030’ वर उभय मंत्र्यांची चर्चा
Posted On:
26 APR 2023 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2023
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज ब्रिटनचे विज्ञान, नवोपक्रम आणि तंत्रज्ञान मंत्री जॉर्ज फ्रीमन यांची भेट घेतली.
दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केलेल्या विस्तृत मुद्द्यांमध्ये यूके-भारत "आराखडा 2030" याचा समावेश होता.
इंडोनेशियातील बाली येथे जी -20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भर दिलेल्या महत्त्वाकांक्षी 'आराखडा 2030' द्वारे उभय देशांमधील घनिष्ट सहयोग मजबूत होण्यावर डॉ जितेंद्र सिंह यांनी प्रकाश टाकला. ‘आराखडा 2030’ आरोग्य, हवामान, व्यापार, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि संरक्षण या सर्व क्षेत्रांतील यूके-भारत संबंधांसाठी एक चौकट प्रदान करतो.
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या युके भेटीदरम्यान उभय देश त्यांच्या नागरिकांसाठी मजबूत आर्थिक परिणामांसह विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य परस्पर लाभदायक बनविण्यावर कसे लक्ष केंद्रित करू शकतात यावर पुढील चर्चा करण्यास उत्सुक असल्याचे सांगत मंत्री फ्रीमन यांनी चर्चेचा समारोप केला.
डॉ जितेंद्र सिंह हे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या उच्चस्तरीय अधिकृत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असून सध्या 6 दिवसांच्या यूके दौऱ्यावर आहेत.
* * *
G.Chippalkatti/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1920068)
Visitor Counter : 120