उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अरुण जेटली हे उदार अंतःकरण असलेले नेते होते ज्यांनी इतरांच्या दृष्टिकोनाचा आदर केला - उपराष्ट्रपती


जेटली हे जीएसटीचे मुख्य शिल्पकार असल्याचे उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन; जीएसटी परिषदेच्या सर्वानुमते निर्णय घेण्याच्या यंत्रणेबद्दल त्यांची केली प्रशंसा

श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये पहिल्या अरुण जेटली स्मृती वादविवाद स्पर्धेत उपराष्ट्रपतींचा सहभाग

Posted On: 26 APR 2023 7:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 एप्रिल 2023

 

श्री अरुण जेटली हे उदार अंतःकरण असलेले नेते होते . त्यांनी नेहमी इतरांच्या दृष्टिकोनाचा आदर केला आणि त्यांना स्थान दिले. ते विरोधी पक्षनेते असताना, सरकारला नेहमीच आश्वासन दिले गेले की तर्कशुद्ध मनाने, तुमच्या  योग्य दृष्टिकोनाचे कौतुक केले जाईल, ज्याची उणीव आज आपल्याला राजकीय संस्कृतीच्या अभावातून भासतेय. नवी दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आज झालेल्या पहिल्या अरुण जेटली स्मृती वादविवाद स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी हे मत नोंदवले.

माजी अर्थमंत्र्यांचा समजूतदारपणा, नम्रता आणि दूरदृष्टीबद्दल त्यांचे कौतुक करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, वस्तू आणि सेवा कर सारख्या त्यांच्या दूरदर्शी उपक्रमांसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांना जीएसटीचे मुख्य शिल्पकार म्हणून संबोधून धनखड म्हणाले की, त्यांनी हे कठीण काम मोठ्या कौशल्याने आणि संयमाने पूर्ण केले.

यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते वादविवाद स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकेही प्रदान करण्यात आली.

दिवंगत अरुण जेटली यांच्या पत्नी संगीता जेटली; एसआरसीसी नियामक मंडळाचे अध्यक्ष अजय एस. श्रीराम; दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. योगेश सिंग; श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या प्रा. सिमरित कौर, प्राध्यापक, विद्यार्थी आदी यावेळी उपस्थित होते.

उपराष्ट्रपतींच्या भाषणाचा मजकूर पुढीलप्रमाणे : 

 

 

* * *

G.Chippalkatti/V.Joshi/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1920022)
Read this release in: English , Urdu , Hindi