संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान भारतीय हवाई दलाच्या कमांडर्स परिषदेत झाले सहभागी

Posted On: 20 APR 2023 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 एप्रिल 2023

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  (सीडीएस) जनरल अनिल चौहान (पीव्हीएसएम, यूवायएसएम, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम) हवाई दलाच्या वायू भवन या मुख्‍यालयामध्‍ये आयोजित केलेल्या भारतीय हवाई दलाच्या कमांडर्स परिषदेमध्‍ये सहभागी झाले. यावेळी त्यांना हवाई दलाच्या  सज्जतेबद्दल  माहिती देण्यात आली.

यानंतर, परिषदेत उपस्थित असलेल्या हवाई दलाच्या  कमांडर्सशी बोलताना, त्यांनी  वाढत्या स्वदेशीकरणाच्या दिशेने पावले उचलताना,  ‘फ्लीट सस्टेनन्स’ च्या दिशेने एक स्पष्ट मार्ग तयार करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांनी तिन्ही सेवांमधील एकात्मता वाढविण्यासाठी असलेली  रूपरेषा आणि त्यातून मिळणाऱ्या फायद्यांवरही चर्चा केली.

हवाई दलाच्या  कमांडर्सच्या परिषदेला 19 एप्रिल 2023 पासून प्रारंभ झाला असनू  या तीन दिवसीय  परिषदेची संकल्पना ‘बियॉंड बौंड्रीज : रोबस्ट फौंडेशन’  अशी निश्चित करण्यात आली आहे. दरवर्षी होणाऱ्या या परिषदेत संपलेल्या  वर्षाविषयी तसेच  भविष्यातील  नियोजित मार्गावर झालेल्या प्रगतीवर चर्चा केली जाते. या परिषदेदरम्यान विविध सरकारी संस्था आणि शैक्षणिक संस्थांची मते मागवली जातात. या परिषदेला  लष्करप्रमुख आणि नौदल प्रमुखही  संबोधित करतात.

 

 

 

S.Kakade/S.Bedekar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1918426) Visitor Counter : 134


Read this release in: English , Urdu , Hindi