शिक्षण मंत्रालय
11व्या ई-यंत्र रोबोटिक्स स्पर्धेमध्ये आयआयटी मुंबईने द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांतील विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी प्रतिभेला दिला वाव
ई-यंत्र येथे 7 वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांवर आधारित स्पर्धेच्या अंतिम फेरीत 35 संघांनी सर्वोच्च पुरस्कारासाठी आणि प्रतिष्ठित समर इंटर्नशिप कार्यक्रमातील सहभागासाठी एकमेकांशी केली स्पर्धा
Posted On:
06 APR 2023 9:50PM by PIB Mumbai
मुंबई, 6 एप्रिल 2023
आयआयटी बॉम्बे अर्थात मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये 31 मार्च ते 1 एप्रिल या दोन दिवसांत देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रतिभेचा आविष्कार पाहायला मिळाला. हे सर्व विद्यार्थी ई-यंत्र रोबोटिक्स या प्रतिष्ठित स्पर्धेच्या 11व्या वर्षाच्या भव्य अंतिम फेरीसाठी तेथे जमले. दरवर्षी आयोजित होणाऱ्या स्पर्धेवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये अनेकदा लहान शहरांतून आलेले विद्यार्थी आयआयटीसह इतर मान्यवर संस्थांतील विद्यार्थ्यांना मागे टाकतात असे दिसून आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या स्पर्धेला मान आहे.
रोबोटिक खेळणी, रोख रक्कम, भेटवस्तू आणि ई-यंत्र मध्ये उन्हाळी प्रशिक्षण यांचा समावेश असलेले एकूण 1 कोटी रुपयांचे पारितोषिक जिंकण्यासाठी अंतिम फेरीत एकूण 35 स्पर्धक संघांनी अटीतटीची लढत दिली. वर्ष 2012 मध्ये ही स्पर्धा सुरु झाल्यापासून, यातील सर्वात अधिक खेळली जाणारी स्पर्धा म्हणजे, सहभागी स्पर्धकांनी हँड्स ऑन प्रशिक्षणाच्या माध्यमातून काही कौशल्ये अवगत करणे.
ही रोबोटिक्स स्पर्धा म्हणजे केंद्रीय शिक्षण विभागातर्फे मिळालेल्या निधीतून, आयआयटी मुंबईच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाच्या यजमानपदात सुरु झालेल्या ई-यंत्र प्रकल्पाचा एक भाग आहे.
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वास्तविक जगातील समस्या सोडवण्यासाठी विविक्षित कार्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून औपचारिक तात्विक आणि प्रयोगांवर आधारित अभ्यासक्रमांच्या परिघाबाहेरील कौशल्ये अवगत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे हे या ई-यंत्र प्रकल्पाचे ध्येय आणि संकल्पना आहे.
या वर्षी, सुमारे 12,000 विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या 3,252 अशा मोठ्या संख्येतील संघांनी ई-वायआरसी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. या वर्षीच्या रोबोटिक्स स्पर्धेत 7 अत्यंत अभिनव संकल्पनांच्या माध्यमातून ‘भविष्यातील शहरां’मध्ये उद्भवणाऱ्या समस्यांवर तंत्रज्ञानाच्या वापरणे उपाय शोधून काढण्यासाठी स्पर्धेतील विद्यार्थ्यांसमोर खेळाच्या स्वरूपातील प्रश्न (ज्यांना संकल्पना म्हटले आहे) मांडण्यात आले होते. या 7 अभिनव संकल्पना खालीलप्रमाणे होत्या:
1. कार्यकारी रस्तेविषयक बॉट (एफबी)
2. कृषीविषयक बॉट (केबी )
3. औषधनिर्माण क्षेत्र विषयक बॉट(पीबी) –
4. स्वच्छता विषयक बॉट (एसबी)
5. वस्तुंच्या वितरणासाठी वापरली जाणारी दुचाकी
6. संरक्षक ड्रोन(एसडी) -
7. एचओआयए बॉट (एचबी) -
ऑगस्ट 2022 पासून या स्पर्धेचा 11 वा भाग सुरु झाल्यापासून सहा महिन्यांच्या काळात, वरील सात संकल्पनांच्या माध्यमातून, या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना रोबोट परिचालन यंत्रणा, ड्रोनचे नियंत्रण, मशीन लर्निंग, इमेज प्रोसेसिंग, त्रिमितीय डिझायनिंग, एंबेडेड सिस्टिम्स, नियंत्रण यंत्रणेचे डिझाईन, फंक्शनल प्रोग्रामिंग, फिल्ड प्रोग्रामेबल गेट अॅरेज (एफपीजीएएस) प्रोग्रामिंग, भौगोलिक माहिती यंत्रणा (जीआयएस), रिमोट सेन्सिंग अशा अनेक गोष्टींच्या तांत्रिक ज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण आणि सहकार्यात्मक शिक्षणाच्या अनेक कठोर फेऱ्या पार केल्यानंतर अरासुर (तामिळनाडू), बार्टन हिल (केरळ), इचलकरंजी (महाराष्ट्र), गोरखपूर (उत्तर प्रदेश), जोधपुर (राजस्थान) आणि तिरुचिरापल्ली (तामिळनाडू) यांसारख्या लहान शहरे आणि नगरांतील संस्थांतून आलेल्या अंतिम फेरीतील या 35 संघांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने अनेक मोठ्या शिक्षणसंस्थांतील विद्यार्थ्यांना देखील मागे टाकले. या विद्यार्थ्यांची अत्यंत क्लिष्ट संकल्पनांच्या बाबतीत असलेली समज पाहून आयआयटी बॉम्बे या संस्थेतील परीक्षक शिक्षक प्रभावित झाले. या विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी क्षेत्रातील परिपक्वता आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रश्नांना दिलेली सुस्पष्ट उत्तरे यामुळे हे परिक्षक आश्चर्यचकित झाले.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना महत्त्वाकांक्षी तांत्रिक प्रकल्पामध्ये काम करण्याची तसेच उद्योजकता आणि सॉफ्ट स्किल्स यांचा अनुभव घेऊ देणारा 6 आठवडे कालावधीचा आणि शुल्काची सर्व रक्कम आधीच भरलेला, उन्हाळी इंटर्नशिप कार्यक्रम जिंकण्याची संधी होती. अत्यंत कडक तांत्रिक अभ्यासक्रमासह या इंटर्नशिप कार्यक्रमात विद्यार्थ्यांना नेहमीच परिवर्तनशील ठरणाऱ्या, भू-राजकीय, भू-अर्थशास्त्र आणि इतर विविध विषयांवरील व्याख्यानांचा देखील लाभ घेता येतो.
* * *
PIB Mumbai | S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1914469)
Visitor Counter : 131