अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनएडीटी, नागपूर येथे 5 एप्रिल रोजी भारतीय महसूल सेवेच्या 75 व्या तुकडीच्या प्रशिक्षणाचा समारोप समारंभ


केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

Posted On: 04 APR 2023 11:52AM by PIB Mumbai

नागपूर  4 एप्रिल 2023

नागपुर येथे स्थित राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी- एनएडीटी   येथे भारतीय महसूल सेवा –आय.आर.एस. च्या  75  व्या तुकडील  47 भारतीय महसूल सेवा-आयआरएस अधिकारी आणि रॉयल भूतान सेवेच्या 02 अधिकाऱ्यांच्या  प्रशिक्षणाचा समारोप समारंभ  5 एप्रिल ,  बुधवार रोजी  सकाळी 10 वाजता  होणार असून याप्रसंगी  केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित  राहणार आहेत.   आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित राहतील.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर ही  केंद्र  सरकारच्या भारतीय महसूल सेवा (आयकर)  अधिकाऱ्यांसाठी असलेली सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षा  द्वारे आयआरएस अधिकाऱ्यांची  निवड केली जाते. थेट निवड झालेले हे  अधिकारी  प्रत्यक्ष कामावर रुजु होण्यापुर्वी  सुमारे 16 महिन्यांचे  सेवाअंतर्गत प्रशिक्षण घेतात.  या प्रशिक्षणादरम्यान, अधिकारी प्रशिक्षणार्थींना कर प्रशासनाच्या विविध पैलूंवर प्रशिक्षित केले जाते आणि त्यांना प्राप्तिकर कायद्यांमध्ये तसेच न्यायशास्त्र तसेच सहयोगी कायदे, सामान्य कायदे आणि व्यवसाय कायदे याबाबत विशेष माहिती प्रदान केली जाते.

अधिकारी प्रशिक्षणार्थींना खाती आणि लेखा प्रणालीचे सखोल प्रशिक्षण दिले जाते.  याशिवाय प्रशिक्षणार्थींना करचोरी आणि  आर्थिक गैरव्यवहार कर प्रकरणे आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये तपासासाठी तयार करण्यासाठी फायनान्शियल फॉरेन्सिक्स आणि सायबर फॉरेन्सिक्समध्ये   देखील प्रशिक्षण  दिले जातात. प्रशिक्षणार्थी विशेषकरून करदात्याच्या सेवांबद्दल संवेदनशील असतात ज्याने करभरणा सुलभ होतो.  प्रशिक्षणाच्या व्यावहारिक बाबींमध्ये आयकर विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांशी तसेच संसदेसह भारतातील विविध घटनात्मक/वैधानिक संस्थांशी संलग्नता समाविष्ट आहे. यामध्ये रिजर्व बँक ऑफ इंडीया. सेबी ,एनएसडीएल यांचा समावेश आहे.   आंतरराष्ट्रीय संघटनासोबत सुद्धा     प्रशिक्षणार्थी  तेथील कर अधिकारक्षेत्रांमध्ये प्रचलित असलेल्या सर्वोत्तम पद्धतींशी अवगत होतात  .

भारतीय महसूल सेवेच्या 75 व्या बॅचमध्ये 49 अधिकारी प्रशिक्षणार्थींचा तसेच  समावेश आहे भूतान रॉयल सर्व्हिसमधील 2 अधिकारी प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. बॅचचे सरासरी वय 28 आहे . या बॅचमध्ये 15 महिला अधिकारी प्रशिक्षणार्थी आहेत .या  बॅचचे प्रतिनिधित्व भारतातील 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश करतात. सर्वाधिक अधिकारी प्रशिक्षणार्थी केरळ (9) आणि त्यानंतर उत्तर प्रदेश (8),झारखंड (6), महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रत्येकी (4) आणि बिहार (3) राज्यातील  आहेत. 73 टक्के अधिकारी प्रशिक्षणार्थींना अभियांत्रिकीची पार्श्वभूमी आहे.  वैद्यकीय विज्ञान पार्श्वभूमीतून 3 अधिकारी प्रशिक्षणार्थी, वाणिज्य शाखेतील 3 आणि कायद्याच्या  शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले  एक अधिकारी प्रशिक्षणार्थी आहेत. 53 टक्के अधिकारी प्रशिक्षणार्थी यांना कामाचा अनुभव  आहेत 33 टक्के अधिकारी प्रशिक्षणार्थीं ग्रामीण पार्श्वभूमी आणि बाकीचे  शहरी किंवा  निम-शहरी प्रदेशातून येतात.

अधिकारी प्रशिक्षणार्थींना कर अधिकारी म्हणून काम करण्यासाठी आणि महसूल वाढीसाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्ये यांनी  सुसज्जीत केले जाते.  16 महिन्याचे  प्रशिक्षण  यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर अधिकारी प्रशिक्षणार्थींना देशभरातील आयकर  कार्यालयांमध्ये आयकर विभागाच्या सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्त  केले जाते. हे अधिकारी    महसूल संकलनाचे संचालन आणि राष्ट्र उभारणीत एक महत्त्वाचा  भूमिका बजावतात. 

***

DWankhede/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1913511) Visitor Counter : 182


Read this release in: English