संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लष्कराच्या अग्निबाज विभागाचा 22 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा

Posted On: 03 APR 2023 3:43PM by PIB Mumbai

पुणे, 3 एप्रिल 2023

 

लष्कराच्या तोफखाना दलातील  अग्निबाज विभागाने 02 एप्रिल 2023 रोजी  22 वा स्थापना दिवस उत्साहात आणि अनेक उपक्रमांनी साजरा केला. स्थापनेपासून  या विभागाचे  सामर्थ्य वाढले आहे.  राजस्थानच्या वाळवंटात  आयोजित केलेल्या दक्षिण शक्ती  या  एकात्मिक क्षेत्रीय  सरावामध्ये  आणि नुकत्याच झालेल्या भारत-आफ्रिका लष्कर प्रमुख परिषदेच्या आयोजनात या विभागाने महत्वाची कामगिरी केली आहे.   

स्थापना दिन सोहळ्याचा  एक भाग म्हणून, एका विशेष सैनिक संमेलनाला विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल बिमल मोंगा, विशिष्ट सेवा पदक यांनी संबोधित केले.तोफखाना विभागात  सुरू असलेल्या आधुनिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक सैनिकाने आधुनिक तांत्रिक प्रगतीबाबत स्वत:ला अद्ययावत ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. उच्च व्यावसायिक  नीतीमूल्यांचे दर्शन घडवल्याबद्दल त्यांनी विभागातील सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली आणि संबंधित क्षेत्रात  उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला.

 

* * *

PIB Pune | M.Iyengar/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1913297) अभ्यागत कक्ष : 212
Read this releasein: English