सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय धोरण

Posted On: 15 MAR 2023 5:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मार्च 2023 

 

वृद्धांच्या कल्याणाची ग्वाही देणाऱ्या वचनबद्धतेची पुष्टी करण्यासाठी वृद्ध व्यक्तींसाठीचे राष्ट्रीय धोरण (एनपीओपी) 1999 मध्ये जाहीर करण्यात आले. आर्थिक आणि अन्न सुरक्षा, आरोग्य सेवा, निवारा आणि वृद्धांच्या इतर गरजा, विकासात समान वाटा, गैरवर्तन आणि शोषणापासून संरक्षण तसेच त्यांचे  जीवनमान सुधारण्यासाठी सेवांची उपलब्धता,  यासाठी हे धोरण पाठबळ देते.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रमाची केंद्रीय क्षेत्र योजना (आयपीएसआरसी) लागू करण्‍यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन (14567) देशभरात सुरू करण्यात आली आहे.

पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतातील कुटुंब आजही आपल्या वृद्ध सदस्यांची काळजी घेणारी पहिली संस्था आहे. विविध मंत्रालये आणि विभागांमार्फत  केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी विविध योजना आणि कार्यक्रम राबवत आहे. यामध्ये निवारा, अन्न, आरोग्यसेवा, आर्थिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, जागरूकता, मनोरंजन इत्यादींचा समावेश आहे. या संदर्भात परिशिष्टामध्‍ये  तपशील देण्‍यात आले आहेत.

या धोरणाविषयी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Bedekar/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1907225) Visitor Counter : 587


Read this release in: English , Tamil