अर्थ मंत्रालय
अवैध मार्गाने आणलेले 53 कोटी रूपये मूल्याचे हेरॉइन सीमाशुल्क विभागाच्या मुंबई शाखेने केले जप्त
Posted On:
08 MAR 2023 8:52PM by PIB Mumbai
मुंबई, 8 मार्च 2023
आदिस अबाबा येथून मुंबईला येणाऱ्या एका प्रवाशाकडून अमली पदार्थाची भारतात तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती, त्याआधारे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने पाळत ठेवली होती.
डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाने 7 मार्च रोजी सकाळी एका संशयित प्रवाशाला अडवले आणि प्रवाशाच्या सामानाची कसून झडती घेतली. यामध्ये संशयिताने ट्रॉली बॅगच्या आत पोकळी बनवून लपवून ठेवलेली 7.6 किलो ‘ऑफ-व्हाइट पावडर’ जप्त करण्यात आली. या भुकटीची चाचणी केल्यानंतर त्यात हेरॉइन असल्याचे आढळले. अवैध आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या हेरॉईनची किंमत सुमारे 53 कोटी रूपये आहे.
या प्रवाशाला अटक करून मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयामध्ये हजर केले असता आरोपीला 10 मार्चपर्यंत डीआरआय कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1905176)
Visitor Counter : 143