संरक्षण मंत्रालय
आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी, सदर्न स्टार आर्मी वाइव्ज वेल्फेअर असोसिएशन(AWWA) ने आयोजित केला भव्य कार्यक्रम
Posted On:
07 MAR 2023 5:49PM by PIB Mumbai
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पुणे इथे,सदर्न स्टार आर्मी वाइव्ज वेल्फेअर असोसिएशन(AWWA) या संस्थेने भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. AWWA या संस्थेच्या क्षेत्रीय अध्यक्षा श्रीमती सुबीना अरोरा यांच्यासह सर्व स्तरातील महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. महिला स्काय डायव्हिंग(गगन भरारी)मध्ये आठ वेळा विश्वविक्रम नोंदवणाऱ्या, शितल महाजन या पद्मश्री सन्मानित क्रीडापटूने मांडलेला उत्कंठावर्धक जीवन प्रवास, या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. तिने जगातील केवळ प्रत्येक खंडां मधून गगनभरारी घेतलेली नाही, तर उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर सुद्धा हा प्रयोग केला आहे. यानंतर डॉ श्रीमती सुचेता भिडे चापेकर यांच्या कलावर्धिनी मंडळाने अत्यंत चैतन्य पूर्ण आणि मोहक शास्त्रीय नृत्य सादर केले. डॉ. श्रीमती सुचेता भिडे चापेकर या जगप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना असून त्यांनी सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स या संस्थेतून पी एच डी ही डॉक्टरेट मिळवली आहे. याशिवाय AWWA च्या व्यावसायिकांनी या कार्यक्रमात सादर केलेलं विविधांगी हस्तकला प्रदर्शनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. वीरनारींच्या सत्काराने कार्यक्रमाची सांगता झाली.

41I9.jpg)
Z9C8.jpg)
CTEF.jpg)
***
Mahesh I/Ashutsh S/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1904964)