माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारकडून भव्य मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन
कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध महिला केंद्रीत प्रशिक्षण सत्रांचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
07 MAR 2023 4:40PM by PIB Mumbai
केंद्रीय संचार ब्युरो हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा एक विभाग केंद्र सरकार सरकारच्या विविध कल्याणकारी योजना ग्रामीण आणि शहरी नागरिकांपर्यंत पोहोचवत असतो.
केंद्रीय संचार ब्युरो चे कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाने उद्याच्या “आंतरराष्ट्रीय महिला दिना”निमित्त महिला सबलीकरण या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन आणि जन जागृती कार्यक्रम आयोजित केला आहे.
रंकाळा तलाव परिसरात (शालिनी पॅलेस समोरील बाग)इथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. महिला कल्याणासाठी केंद्र तसेच राज्य सरकारच्या त्याचबरोबर कोल्हापूर महापालिकेच्या विविध योजनांची माहिती या प्रदर्शनात पाहायला मिळेल.
8 मार्च ते 12 मार्च असे पाच दिवस चालणारे हे प्रदर्शन
छायाचित्रे, VR, AR, डिजिटल कोडी, अशा मल्टीमीडिया घटकांनी समृध्द राहील.
ह्या प्रदर्शनाबरोबर पत्र सूचना कार्यालय मुंबई यांनी काही प्रशिक्षण शिबिर आणि कार्यशाळांचे आयोजन केले आहे. त्यांची माहिती खालीलप्रमाणे:
उद्घाटनाच्या सत्रात महिलांच्या आर्थिक आणि डिजिटल साक्षरतेसाठी काम करणाऱ्या माणदेशी फाउंडेशन यांचे महिलांसाठी डिजिटल साक्षरता शिबिर संपन्न होईल. माणदेशी फाउंडेशनच्या कार्यशाळेत प्रशिक्षण, अनुभवाची देवाणघेवाण आणि त्यांच्या प्रदर्शनी बसला भेट देणे यांचा समावेश असेल.हे सत्र सकाळी 11:30 ला सुरु होईल.
प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी (9 मार्चला) कायदेविषयक साक्षरतेसाठी खास करून संपत्ती व इतर कायद्यांविषयी महिलांना परिचित करण्यासाठी ज्येष्ठ वकील संतोष शहा प्रशिक्षण शिबिर संबोधित करतील. हे सत्र सकाळी दहा वाजता सुरु होईल.
कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी 11 मार्च रोजी एकलव्य फाउंडेशन द्वारे आर्थिक दृष्ट्या वंचित वर्गातील मुलांसाठी दहावी बारावीनंतर उच्च शिक्षणाच्या संधी या विषयावर प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाईल व त्यातून होतकरू मुलांना निवडून त्यांना उच्च शिक्षणासाठी आणखी मदत केली जाईल. या सत्रात पूनम ढोबळे दुपारी 2 ते 4 या वेळेत मार्गदर्शन करतील.
सांकृतिक पथके सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करतील.जास्तीत जास्त नागरिकांनी याप्र दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रीय संचार ब्युरो तर्फे करण्यात येत आहे
स्वातंत्र्य दिनानिमित्त छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे तसेच राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मिरज येथे अशाच प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. माणदेशी फाउंडेशनचे प्रशिक्षण सत्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Multimedia Exhibition on International Women's Day at Rankala Kolhapur
***
Nilima C/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1904885)
आगंतुक पटल : 330
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English