पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंचाहत्तर वर्षांपूर्वी भारतातून ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी गेली, त्याच्या स्मरणार्थ गेटवे ऑफ इंडिया येथे 'मल्टीमीडिया लाईट अँड साऊंड शो'चे उद्‌घाटन


‘मल्टीमीडिया लाईट अँड साउंड शो’ गेटवे ऑफ इंडियाच्या वैभवात भर घालेल : केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी

Posted On: 01 MAR 2023 6:42PM by PIB Mumbai

मुंबई, 1 मार्च 2023

गेटवे ऑफ इंडिया येथे पर्यटन विभाग, महाराष्ट्र सरकार, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, केन्द्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने 'मल्टी मीडिया लाईट अँड साउंड शो' म्हणजेच बहुमाध्‍यम प्रकाश आणि ध्‍वनी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.  केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री, हरदीप सिंग पुरी यांनी दूरदृश्‍य प्रणालीव्‍दारे   ‘मल्टीमीडिया लाईट अँड साउंड शो’ च्या प्रारंभाबद्दल शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, इंडियन ऑईलचे अध्यक्ष श्रीकांत  माधव वैद्यइंडियन ऑइलचे संचालक (विपणन) व्ही. सतीश कुमार आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यावेळी उपस्थित होते.

ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी (द सॉमरसेट लाइट इन्फंट्री) 28 फेब्रुवारी 1948 रोजी भारतातून गेली. या घटनेला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने , 28 फेब्रुवारी 2023 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे या उपक्रमावर आनंद व्यक्त करताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री, हरदीप सिंग पुरी म्हणाले. मुंबई शहर हे जागतिक शहर म्हणून ओळखले जाते. जगभरातील पर्यटक वर्षभर शहराला भेट देतात.  पर्यटन विभाग, महाराष्ट्र सरकार, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि भारत सरकार यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे हा 'मल्टीमीडिया लाईट अँड साउंड शो' पुढील पाच वर्ष सुरु राहणार असून, गेटवे ऑफ इंडियाच्या वैभवात भर पडेल. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे असे ते म्हणाले.

"नवीन पिढीला गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास समजण्यासाठी असे उपक्रम आवश्यक आहेत असे  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या ध्येयदृष्टी अंतर्गत 'मल्टीमीडिया लाईट अँड साउंड शो' हा अनेक कार्यक्रमांपैकी एक आहे. ब्रिटीश सैन्याने भारतातून शेवटचे प्रस्थान केल्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ 'मल्टीमीडिया लाइट अँड साउंड शो' आजपासून गेटवे ऑफ इंडिया येथे दाखवण्यात येणार आहे. या उपक्रमाचा मुंबईतील नागरिकांना फायदा होणार आहे.  इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने हा शो आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे असे फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र सरकारचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या उपक्रमाच्या प्रारंभाच्या महत्त्वाकडे लक्ष वेधले. आपण इतिहासात शिकलो की  गेटवे ऑफ इंडियाच्या इथून ब्रिटीश  भारतात आले, परंतु हा 'मल्टीमीडिया लाईट अँड साउंड शोशेवटच्या ब्रिटीश बटालियनने भारत सोडला हे भारतीयांना जाणवून  देईल असे  लोढा म्हणाले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात  इंडियन ऑइलचा सहभाग आहे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य म्हणाले. 'मल्टीमीडिया लाईट अँड साऊंड शो'मधील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या योगदानाबद्दल ते बोलत होते. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित 'मल्टीमीडिया लाईट अँड साऊंड शो' प्रागतिक भारत संकल्पनेवर आधारित आहे. स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे महत्त्व यात अधोरेखित झाले आहे.

इथून पुढे गेटवे ऑफ इंडिया येथे प्रत्येक आठवड्याच्या शेवटी मल्टीमीडिया लाईट अँड साउंड शो आयोजित केला जाईल.  हा शो मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये आहे. हेडसेटच्या मदतीने तो जपानी, जर्मन, फ्रेंच आणि रशियन भाषांमध्येही ऐकता येईल.

 

  

 

 

 

 

S.Bedekar/V.Ghode/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1903447) Visitor Counter : 169


Read this release in: English