सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा राष्ट्रीय उत्पन्नाचा दुसरा अंदाज, सकल राष्ट्रीय उत्पादनाचा तिसऱ्या तिमाहीसाठीचा (ऑक्टोबर-डिसेंबर)तिमाही अंदाज, आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा पहिला सुधारित अंदाज जारी

Posted On: 28 FEB 2023 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2023  

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने, आज आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा दुसरा आगावू अंदाज, सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दुसऱ्या तिमाहीसाठीचा तिमाही अंदाज यांच्यासह खर्च आणि राष्ट्रीय उत्पन्न, ग्राहकांच्या उपभोगावरील खर्च, बचत तसेच भांडवल निर्मितीविषयीचा अंदाज व्यक्त केला आहे. यात--

a.आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा पहिला सुधारित अंदाज;

b.आर्थिक वर्ष 2020-21 साठीचा दुसरा सुधारित अंदाज; आणि,

c.आर्थिक वर्ष 2019-20 साठीचा तिसरा सुधारित किंवा अंतिम अंदाज.  

हे अंदाज स्थिर आणि सध्याच्या किमतीच्या आधारावर निश्चित करण्यात आले असून राष्ट्रीय खात्याच्या  आकडेवारीच्या अनुसार हे अंदाज जारी करण्यात आले आहेत.  

यानुसार, रिअल जीडीपी म्हणजेच वास्तविक सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) स्थिर (2011-12) किंमती 2022-23 मध्ये 159.71 लाख कोटी रुपयांची पातळी गाठण्याचा अंदाज आहे. आधीच्या म्हणजे 2021-22 च्या जीडीपीच्या पहिल्या सुधारित अंदाजानुसार ही पातळी  149.26 लाख कोटी रुपये इतकी असेल, असे व्यक्त करण्यात आले होते. टक्केवारीत सांगायचे झाल्यास,  2021-22 मधील 9.1 टक्क्यांच्या तुलनेत 2022-23 मध्ये जीडीपी मधील वाढीचा अंदाज 7.0 टक्के इतका आहे.

2021-22 च्या  234.71 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत,  2022-23 मध्ये नॉमिनल जीडीपी म्हणजे सध्याच्या किंमतींवर आधारित जीडीपीची पातळी 272.04 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. म्हणजेच या सुधारित अंदाजानुसार, या  जीडीपीमध्ये 15.9 टक्के वाढ दिसते आहे.

राष्ट्रीय उत्पन्नाचा दुसरा अग्रिम अंदाज, 2022-23,

आर्थिक वर्ष 2022-23 साठीच्या तिसऱ्या तिमाहीतील (ऑक्टोबर –डिसेंबर ), सकल राष्ट्रीय उत्पादनाचा तिमाही  अंदाज

या भागात आर्थिक वर्ष 2022-23 साठी राष्ट्रीय उत्पन्नाचा दुसरा अग्रिम अंदाज (SAE) तसेच 2022-23 (Q3 2022) च्या तिसऱ्या तिमाहीसाठी सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) चे तिमाही अंदाज, स्थिर आणि सध्याच्या  किंमतीवर  दिले  आहेत.

स्थूल/निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नाचा अंदाज स्थूल मूल्यवर्धित (GVA) सोबतच आर्थिक घडामोडी आणि आर्थिक वर्ष 2022-23 साठी GDP च्या खर्चाच्या घटकांबरोबरच  तिमाही अंदाज तसेच 2020-21, 2021-22 आणि 2022-23 एप्रिल-डिसेंबर या तिमाहीसाठीचा स्थिर (2011-12) आणि सध्याच्या किंमती, टक्केवारीत झालेला बदल व्यक्त करण्यात आला आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा वास्तविक जीडीपी (स्थिर किमतीवर आधारित) (2011-12) 159.71 लाख कोटी रुपये इतका असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2021-22  या वर्षासाठीचा पहिला सुधारित अंदाज 149.26 लाख कोटी रुपये इतका होता. 2021-22 मधल्या  9.1  टक्क्याच्या तुलनेत 2022-23 साठी वास्तविक जीडीपीमध्ये 7.0 टक्के वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

2022-23 मध्ये नॉमिनल जीडीपी म्हणजेच सध्याच्या किंमतींवर आधारित जीडीपी अंदाजे 272.04 लाख कोटी रुपये व्यक्त करण्यात आला आहे, 2021-22 च्या जीडीपीच्या पहिल्या सुधारित अंदाजाप्रमाणे ही वाढ 234.71 लाख कोटी रुपये असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. टक्केवारीत सांगायचे झाल्यास, 2021-22 मधील 18.4 टक्क्यांच्या तुलनेत 2022-23 मध्ये नाममात्र GDP मधील वाढीचा अंदाज 15.9 टक्के आहे.

राष्ट्रीय उत्पन्नाचा पहिला सुधारित अंदाज,

उपभोग खर्च, बचत आणि भांडवल निर्मिती, 2021-22

या भागात 2021-22 या आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय उत्पन्न, उपभोग खर्च, बचत आणि भांडवल निर्मितीचे पहिले सुधारित अंदाज 2020-21 आर्थिक वर्षासाठी दुसरे सुधारित अंदाज आणि 2019-20 आर्थिक वर्षासाठी तिसरे सुधारित अंदाज (आधारभूत वर्ष 2011-12) दिले आहेत.

2. वर्ष 2021-22 साठीचा पहिला सुधारित अंदाज 31 मे 2022 रोजी तात्पुरता अंदाज जारी करताना बेंचमार्क-इंडिकेटर पद्धतीचा वापर न करता 2021-22 या वर्षासाठीचे पहिले सुधारित अंदाज उद्योगवार/संस्थावार तपशीलवार माहिती वापरून संकलित केले गेले आहेत. 2019-20 आणि 2020-21 या वर्षांसाठीचा जीडीपी आणि इतर एकत्रित अंदाजांमध्ये देखील कृषी उत्पादनावरील  उपलब्ध अद्ययावत डेटाच्या वापरामुळे सुधारणा झाल्या आहेत; औद्योगिक उत्पादन (ASI चे अंतिम निकाल: 2019-20); अर्थसंकल्पीय दस्तऐवजांमध्ये उपलब्ध सरकारी डेटा (वर्ष 2020-21 साठी सुधारित अंदाज वास्तविकतेसह बदलणे); कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (MCA), रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) इत्यादी सारख्या विविध स्त्रोत एजन्सींकडून उपलब्ध सर्वसमावेशक डेटा आणि राज्य/UT अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालय (DES) कडून अतिरिक्त डेटा ).

3. सरासरी पातळीवरील  सुधारित  अंदाजाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:

सकल राष्ट्रीय उत्पादन

4. 2021-22 साठी नॉमिनल म्हणजेच सध्याच्या किमतींनुसार जीडीपी 234.71 लाख कोटी रुपये असेल असा अंदाज आहे. 2020-21 मध्ये व्यक्त करण्यात आलेल्या 198.30  लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 2021-22 ला  हा अंदाज वाढलेला आहे. टक्केवारीनुसार, 2020-21  च्या 1.4 टक्क्यांच्या  तुलनेत 2021-22 मध्ये ही वाढ 18.4  टक्के इतकी आहे.

5. 2021-22 आणि 2020-21 या वर्षांसाठी स्थिर (2011-12) किमतींवर वास्तविक जीडीपी अनुक्रमे 149.26 लाख कोटी रुपये   आणि 136.87 लाख कोटी रुपये इतका आहे.

Click here to see Press Note in PDF

 

N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1903194) Visitor Counter : 3008


Read this release in: English , Hindi