पर्यटन मंत्रालय
भरड धान्यांबाबत जागृती करण्यासाठी इंडिया टुरिझमने भारतीय प्रौद्योगिकी संस्थेच्या सहयोगाने मुंबईमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली कार्यशाळा
Posted On:
28 FEB 2023 7:47PM by PIB Mumbai
मुंबई, 28 फेब्रुवारी 2023
संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने मार्च 2021 मध्ये आपल्या 75 व्या सत्रात 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (IYM 2023) म्हणून घोषित केले. भारताच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने, आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 चा प्रस्ताव ठेवला होता, ज्याला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली.
भरड धान्य हे पुरातन काळापासून आशिया आणि आफ्रिकेमधील पारंपरिक अन्न आहे. हे खरीपाचे पीक असून, त्याच्या लागवडीसाठी त्याच श्रेणीतील इतर पिकांच्या तुलनेत पाणी आणि इतर घटकांची कमी आवश्यकता असते.

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करण्यासाठी सर्व स्तरातील व्यक्तींचा सहभाग आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन, इंडिया टुरिझम, मुंबईने भारतीय प्रौद्योगिकी संस्था मुंबईच्या सहयोगाने, भरड धान्यांचा आहारात समावेश करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी, मुंबईमध्ये पर्यटन आणि आदरातिथ्य शाखेचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा आयोजित केली होती. सेलिब्रिटी शेफ जर्सन फर्नांडिस यांनी आज दुपारी 3.00 ते 4.30 या वेळेत आयआयटी मुंबई इथे, पीसी सक्सेना सभागृहात ही कार्यशाळा घेतली. शेफ जेर्सन फर्नांडिस हे मुंबईत जुहू इथल्या नोव्होटेल हॉटेलचे पाक-शास्त्र संचालक आहेत.

मुंबईतील विविध महाविद्यालयांच्या युवा टुरिझम क्लब्सनीही आपला सहभाग नोंदवून ही कार्यशाळा यशस्वी करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली. तरुणांच्या आहारात सहज समाविष्ट करता येतील अशा भरड धान्यांच्या पाककृती, त्याची पोषण मूल्य, आणि भरड धान्यांवरील प्रश्नमंजुषा यावेळी आयोजित करण्यात आल्या.

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1903167)
Visitor Counter : 85