पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
आंतरराष्ट्रीय हवामान व्यवस्थेला देश केंद्रीत दृष्टीकोनाकडून लोक केंद्रीत दृष्टीकोनाकडे वळावे लागेल: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी
प्रविष्टि तिथि:
24 FEB 2023 7:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2023
"आंतरराष्ट्रीय हवामान व्यवस्थेत बदल घडवून आणण्याची वेळ आली आहे. या व्यवस्थेला 'देश-केंद्रित' दृष्टिकोनाकडून 'लोककेंद्रित' दृष्टिकोनाकडे वळून हवामान कृतींकडे जावे लागेल.", असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज सांगितले. ते जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2023 च्या ‘मेनस्ट्रीमिंग सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड क्लायमेट रेझिलियन्स फॉर कलेक्टिव्ह अॅक्शन’ या विषयावरील समापन सत्रात बोलत होते.
शतकातून एकदा आलेल्या साथीच्या आजारातून जग सावरत आहे; जगाच्या काही भागात भू-राजकीय संघर्ष आहेत; थ्री-एफ (अन्न, इंधन, खते) संकट ऊर्जा सुरक्षा धोक्यात आणते; आणि पुढील काही वर्षे आर्थिक अनिश्चितता कायम राहील, असे ते म्हणाले. हे मुद्दे शाश्वत विकासावर आज होत असलेल्या चर्चेशी घट्ट जोडलेले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
पाणी आणि स्वच्छता, गृहनिर्माण, अन्न, ऊर्जा उपलब्धता, डिजिटल संपर्क आणि आर्थिक समावेशकतेत झालेल्या परिवर्तनीय प्रगतीमुळे सेवा क्षेत्राचा अभूतपूर्व वापर झाला आहे. विकासाचा हा दृष्टीकोन ‘कोणालाही मागे सोडू नका’ या शाश्वत विकासाच्या उद्दिष्ट तत्त्वज्ञानाशी ताळमेळ ठेवतो, असे ते म्हणाले.
हरित संक्रमणाच्या दिशेने भारताच्या वाटचालीबद्दल बोलताना ते म्हणाले की सरकार हरित अर्थव्यवस्थेकडे संक्रमण आणि विविध क्षेत्रांमध्ये ऊर्जेचा कार्यक्षम वापर करण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवत आहे. भारताचे ग्रीन हायड्रोजन धोरण हा एक क्रांतिकारी बदल आहे, हा बदल भारताला ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया उत्पादनातील जागतिक केंद्र बनवणार आहे. 2030 पर्यंत वार्षिक 5 मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे, अशी माहिती पुरी यांनी दिली.
S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1902148)
आगंतुक पटल : 146