परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताचे जी-20 अध्यक्षपद ही एक विशेष जबाबदारी - परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर


भारत आज समस्येवर उपाय शोधून देणारा देश आहे – डॉ. एस. जयशंकर

Posted On: 23 FEB 2023 7:53PM by PIB Mumbai

पुणे, 23 फेब्रुवारी 2023

भारताचे जी-20 अध्यक्षपद ही जगासाठी आव्हानात्मक असलेल्या काळात भारताला मिळालेली एक विशेष जबाबदारी आहे, असे मत, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी व्यक्त केले. आज जगाला भेडसावणाऱ्या आणि भविष्यातील समस्यांवर आज भारत जगाला उपाय शोधून देणारा देश ठरला आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुण्याजवळच्या लवाळे येथील सिंबॉयसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) परिसरात आज भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळातील जी-20- विचारवंत महोत्सव शिखर परिषदेत त्यांचं व्याख्यान झालं, त्यावेळी ते म्हणाले, देशहिताचे संरक्षण करण्यासाठी उभे राहण्याचा आमचा भक्कम संकल्प आहे, तसेच दक्षिणेकडील  राज्यांचा आवाज बनण्याची स्वायत्तताही आहे.

आज जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, यावर भर देत, ते म्हणाले की भारत एक सभ्य संस्कृतीचा वारसा असलेला देश असून या काळात अशा नव्या युगाचे नेतृत्व करत आहोत जिथे विविधतेचा आदर ठेवला जातो. एक असा देश, ज्याची ऊर्जा, उत्साह आणि सृजनशीलता दिवसेंदिवस वाढते आणि त्याच्या भवितव्याविषयी संपूर्ण जगाला विशेष रस आहे.

G 20 च्या अध्यक्षपदाविषयी बोलताना डॉ. जयशंकर म्हणाले की G-20 हे सर्वात महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे आणि या अध्यक्षपदाच्या एक वर्षाच्या कारकिर्दीत भारत जे काही करेल, त्यामुळे जगाच्या राजकारणात मोठा फरक पडू शकेल.

सिंबॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक आणि अध्यक्ष तसेच कुलगुरू डॉ. एस.बी. मुजुमदार, या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाला परदेशी विद्यार्थ्यांसह  विविध विद्या शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते, कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी जयशकंर यांच्याशी संवादही साधला.

 

 

 

 

 

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1901854) Visitor Counter : 350


Read this release in: English