सांस्कृतिक मंत्रालय
गोवा विज्ञान केंद्रातर्फे विज्ञान महोत्सवाचे आयोजन
Posted On:
23 FEB 2023 2:07PM by PIB Mumbai
गोवा विज्ञान केंद्र, विज्ञान महोत्सवाचे (सायन्स फिएस्टा)-2023 आयोजन करणार आहे. गोवा सरकारच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण विभागाच्या सहकार्याने 25 ते 28 फेब्रुवारी 2023 दरम्यान विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून विज्ञान महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. देशातील आघाडीच्या वैज्ञानिक आणि संशोधन संस्था या कार्यक्रमात सहभागी होत आहेत आणि सामाजिक हिताच्या दृष्टीने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या महत्त्वपूर्ण विकासावर प्रकाश टाकणारे एक प्रदर्शन भरवणार आहेत.
विज्ञान प्रदर्शन 25 ते 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत सर्वांसाठी खुले राहील. सायन्स फिएस्टा- 2023 चे उद्घाटन 25 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे संचालक प्रो. सुनील कुमार सिंग यांच्या हस्ते होणार आहे. युवा पिढीत विज्ञानाची गोडी निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमादरम्यान अनेक स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.



***
(Source: Goa Science Centre) /ST/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1901666)
Visitor Counter : 236