मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सागर परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्याला आज प्रारंभ


सागर परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्यात गुजरात आणि महाराष्ट्रातील बंदरांचा अंतर्भाव

केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परषोत्तम रूपाला येत्या 20 आणि 21 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्रातल्या किनारपट्टी समुदायांना भेट देऊन मच्छीमार आणि मत्स्य शेतकऱ्यांशी  साधणार संवाद

Posted On: 19 FEB 2023 2:16PM by PIB Mumbai

 

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्तीनिमित्त अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  भारत सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभाग, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाने सागर परिक्रमेचं आयोजन केलं आहे. सागर परिक्रमाचा तिसरा टप्पा गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान आखला जात आहे.

सागर परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्याला गुजरात मधील सुरतच्या हाजीरा बंदर इथून माध्यमांशी संवाद साधत 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून हा प्रवास महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दिशेने होणार आहे. यादरम्यान उत्तर महाराष्ट्रातले सातपाटी, वसई, वर्सोवा, ससून गोदी आणि मुंबईतील इतर क्षेत्रात 20 आणि 21 तारखेला प्रवास होणार आहे.

केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परषोत्तम रूपाला या परिक्रमे दरम्यान महाराष्ट्रातल्या किनारपट्टी समुदायांना भेट देऊन तिथल्या मच्छीमार आणि मत्स्य शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या प्रवासात त्यांच्याबरोबर  देशभरातले भारत सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारीराष्ट्रीय मत्स्य व्यवसाय विकास मंडळ, मत्स्य व्यवसाय सर्वेक्षण, भारतीय किनारपट्टी सुरक्षा, राज्य मत्स्य अधिकारी, मत्स्य शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक, अधिकारी आणि वैज्ञानिकांचा समावेश असेल.

या परिक्रमेदरम्यान शिकाऊ मच्छीमार विशेषतः किनारपट्टी भागातील मच्छीमारमत्स्य व्यावसायिक आणि मत्स्य शेतकरी, युवा मत्स्य उद्योजक यांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, किसान क्रेडिट कार्ड आणि राज्य योजनेशी  संबंधित प्रमाणपत्र आणि मंजुरी प्रदान केल्या जाणार आहेत. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, राज्य योजना, F I D F अर्थात मत्स्य व्यवसाय आणि मत्स्यपालन पायाभूत सुविधा विकास निधी K C C अर्थात किसान क्रेडिट कार्ड याबाबत शिक्षित केले जाणार आहे. यासाठी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया,, व्हिडिओ डिजिटल प्रचार मोहीम आणि जिंगल्सच्या माध्यमातून याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली जाणार आहे. या योजनांसोबतच सागर परिक्रमेवर मराठीतून  गाणं सुद्धा प्रकाशित केलं जाणार आहे,

सागर परिक्रमेच्या प्रवासादरम्यान देशाच्या अन्न सुरक्षेसाठी सागरी मत्स्यपालन संसाधनांचा वापर आणि किनारपट्टीवरील मच्छीमार समुदायांचे जीवनमान आणि सागरी परिसंस्थांचे संरक्षण, मच्छीमार समुदायांमधील अंतर भरून काढण्यासाठी आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने शाश्वत समतोल साधण्यावर भर असणार आहे. मासेमारी करणाऱ्या गावांचा विकास, परिसंस्थेच्या दृष्टिकोनातून शाश्वत आणि जबाबदार विकास सुनिश्चित करण्यासाठी मासेमारी बंदर आणि तळ यासारख्या पायाभूत सुविधांची सुधारणा आणि निर्मिती यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे.

परिक्रमेच्या प्रस्तावनेदाखल भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाने 16 आणि 17 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्रात मत्स्य व्यवसायासाठी किसान क्रेडिट कार्डच्या प्रसिद्धीसाठी मोहिमेचं आयोजन केलं होतं. मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र राज्य सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या डॉ. नियती जोशी, निखिल कुमार, सागर कुवेसकर, डॉ. संदीप पी. जाधव या अधिकाऱ्यांनी वसई इथे 16 फेब्रुवारी 2023 रोजी आणि ससून गोदी इथे 17 फेब्रुवारी 2023 रोजी बैठक घेऊन एक शिबिर आयोजित केलं होतं. मच्छीमार आणि शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड, त्याची नोंदणी प्रक्रिया आणि त्याचे लाभ याबाबत माहिती देऊन जागरूक करण्यात आलं.

महाराष्ट्र राज्याला 720 किमी लांबीचा किनारा लाभला आहे ज्यात ठाणे, रायगड, बृहन्मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5 किनारपट्टी जिल्ह्यांचा समावेश होतो. मच्छीमार मंडळी, विक्रेते आणि मत्स्यउद्योग यांचा मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने आर्थिक मूल्य आणि विशेषतः निर्यातीत थेट सहभाग आहे.

सागर परिक्रमा कार्यक्रम किनारपट्टी लगतची राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या समावेशासह पूर्व-निर्धारित सागरी मार्गाने आयोजित केला जात आहे. गुजरातमध्ये आयोजित 'सागर परिक्रमा'चा पहिला टप्पा 5 मार्च 2022 रोजी मांडवी इथून सुरू झाला आणि 6 मार्च 2022 रोजी गुजरातच्या पोरबंदर इथं संपन्न झाला. सागर परिक्रमेचा दुसरा टप्पा 22 सप्टेंबर 2022 रोजी मंगरूळ ते वेरावळ असा सुरू झाला आणि 23 सप्टेंबर 2022 रोजी मूल द्वारका ते मधवाड इथं संपला. भारताची संपूर्ण किनारपट्टी व्यापेपर्यंत हा प्रवास टप्प्याटप्प्यानं सुरू राहणार आहे.

***

A.Chavan/S.Naik/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1900517) Visitor Counter : 299


Read this release in: English