संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दक्षिण कमांडद्वारे सदर्न स्टार आर्मी -शिक्षण -उद्योग सन्मुखता कार्यक्रमाचे 17 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजन

Posted On: 17 FEB 2023 6:48PM by PIB Mumbai

पुणे, 17 फेब्रुवारी  2023

दक्षिण कमांड  क्षेत्रीय तंत्रज्ञान कक्षाने (आरटीएन) 17 फेब्रुवारी 2023 रोजी पुण्यातील कमांड रुग्णालयाच्या चरक सभागृहात 'सदर्न स्टार आर्मी - शिक्षण -उद्योग सन्मुखता' (S2A2I2) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दक्षिण सैन्य कमांडर, अतिविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक प्राप्त लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांनी उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींच्या मेळाव्याला संबोधित केले. दक्षिण कमांड मुख्यालयाचे सैन्य प्रमुख, लेफ्टनंट जनरल मनजीत कुमार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

विविध भागधारकांना परस्परसंवादी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या उद्योग संस्था, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि लष्कर अशा विविध क्षेत्रातील सुमारे 100 सहभागींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि आयआयटी मुंबई  आणि स्थानिक उद्योगांकडून स्वदेशी निर्मित नवोन्मेषांचे स्वारस्यपर प्रदर्शनही आयोजित केले गेले.

लेफ्टनंट जनरल ए के सिंह यांनी आपल्या भाषणात, विशेषत: अलीकडील जागतिक घटनांच्या पार्श्वभूमीवर, स्वदेशी संरक्षण उत्पादनाकडे वळण्याच्या तातडीच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले की, सशस्त्र दलांनी सूचना मिळताच अल्पावधीत कारवाईसाठी सज्ज असणे आवश्यक आहे आणि पारंपरिक युद्धाला समकालीन तंत्रज्ञानाचे पाठबळ मिळाले पाहिजे. स्वदेशीकरणामुळे आपल्या स्वतःच्या सुरक्षेच्या गरजा सोडवण्यास मदत होईल आणि राष्ट्राला स्वतःच्या शस्त्रास्त्र प्रणालीचा निर्माता म्हणून समोर येण्यास मदत होईल यावर त्यांनी भर दिला.

लेफ्टनंट जनरल ए के सिंह यांनी नमूद केले की व्यवसाय करण्याचे नियम सोपे केले आहेत आणि उद्योगांना मदत करण्यासाठी नवीन नियम लागू करणे, जलदगती संशोधन आणि विकास (R&D) आणि खरेदी प्रक्रियेला गती देणे यासाठी सरकारने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. याशिवाय, संरक्षण संपादन प्रक्रियेत नवीन बदल आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता अंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदीत लक्षणीय वाढ जाहीर करण्यात आली आहे. यामुळे संरक्षण खरेदीला अपेक्षित गती मिळेल. लेफ्टनंट जनरल ए के सिंग यांनी उपस्थितांना विचारांची देवाणघेवाण सुरू ठेवण्याचे आवाहन केले जेणेकरुन उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील क्षमता समजून घेऊन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लष्कराची क्षमता प्रभावीपणे वाढू शकेल.

एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबाने यांनी उद्घाटनपर भाषण केले. कार्यक्रमातील इतर वक्त्यांमध्ये भारत फोर्ज डिफेन्स अँड एरोस्पेसचे अध्यक्ष आणि सीईओ राजिंदर सिंग भाटिया यांचा समावेश होता, ज्यांनी 'भारतीय सैन्यात तंत्रज्ञान अंतर्भावाचे समर्थन' याविषयी तर आयआयटी मुंबईतील  एनसीईटीआयएस प्राध्यापक सुहास राऊतमारे यांनी ‘लष्करी स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक संधी आणि वाव ' या विषयावर माहिती दिली. आरटीएनचे अध्यक्ष ब्रिगेडियर एनपी सिंग यांनीही भारतीय लष्करातील ‘आत्मनिर्भरता’ याबाबत माहिती दिली.

 

 

S.Kulkarni/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1900229) Visitor Counter : 159


Read this release in: English