विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था आणि दुर्लक्षित आजार संशोधन संस्था, बेंगळुरू यांच्यात, "सागरी नैसर्गिक उत्पादन औषध संशोधन" क्षेत्रातील दीर्घकालीन सहयोगासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी
Posted On:
16 FEB 2023 9:31PM by PIB Mumbai
पणजी, 16 फेब्रुवारी, 2023
सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (सीएसआयआर-एनआयओ) आणि दुर्लक्षित आजार संशोधन प्रतिष्ठान (एफएनडीआर), बेंगळुरू यांच्यात, "सागरी नैसर्गिक उत्पादन औषध संशोधनाच्या" क्षेत्रात दीर्घकालीन सहयोग विकसित करण्यासाठी, 10 फेब्रुवारी 2023 रोजी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली.
सीएसआयआर-एनआयओ चे संचालक प्राध्यापक सुनील कुमार सिंह आणि एफएनडीआर चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीधर नारायणन यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. व्यवसाय विकास गटाचे प्रमुख डॉ.व्ही.व्ही. सनील कुमार, रासायनिक समुद्र विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. नरसिंह .एल. ठाकूर, आणि सीएसआयआर-एनआयओ च्या संयुक्त पीठाचे व्यंकट कृष्णमूर्ती यावेळी उपस्थित होते.
सीएसआयआर-एनआयओ, सागरी नैसर्गिक उत्पादन रसायनशास्त्र आणि बायोप्रोस्पेक्टिंग क्षेत्रावर केंद्रित असलेल्या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, "सागरी बायोप्रोस्पेक्टिंग" संशोधन आणि विकास प्रकल्पा अंतर्गत, सागरी नैसर्गिक उत्पादन भांडार विकसित करत आहे. यासाठी सीएसआयआर ने अर्थसहाय्य केले आहे. सीएसआयआर-एनआयओ द्वारे विकसित करण्यात आलेल्या सागरी नैसर्गिक उत्पादनांच्या भांडारांच्या तपासणीमध्ये येनडीआर चा सहभाग आहे. हा सामंजस्य करार आता, या दोन संस्थांच्या, सागरी नैसर्गिक उत्पादन औषध संशोधनाच्या क्षेत्रामधील परस्पर सामर्थ्यावर आधारित पुढील अर्थपूर्ण परस्परसंवादासाठीचा पथदर्शक आराखडा सुलभ करेल.
S.Thakur/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1899982)
Visitor Counter : 150