युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
दुसऱ्या फिट इंडिया प्रश्नमंजूषेच्या प्राथमिक फेरीत मुंबईच्या चिल्ड्रन अकादमीतील स्मृणील शाह अव्वल
Posted On:
16 FEB 2023 7:18PM by PIB Mumbai
मुंबई, 16 फेब्रुवारी, 2023
दुसऱ्या फिट इंडिया प्रश्नमंजूषेच्या प्राथमिक फेरीचे निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आले. मोबाईलच्या माध्यमातून घेतलेली देशातील सर्वात मोठी ‘ऑनलाइन क्रीडा आणि तंदुरूस्ती या विषयावरची ही प्रश्नमंजूषा आहे. भारतातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाते.
मुंबई शहरातील अशोक नगर येथील चिल्ड्रन्स अकादमीतील स्मृणील शाह याने प्राथमिक फेरीत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. राज्यातून अव्वल आलेल्या विद्यार्थ्याबरोबर खालील दूरध्वनी क्रमांकावर, शाळा प्रमुखांमार्फत संपर्क साधता येईल.
विद्यार्थी
|
शाळा
|
शाळा प्रमुख
|
दूरध्वनी क्रमांक
|
स्मृणील शाह
|
चिल्ड्रन्स अकादमी, अशोक नगर, मुंबई शहर, महाराष्ट्र
|
शीला मल्ल्या
|
9833391296
|
या प्रश्नमंजूषा स्पर्धेत गुजरातमधील प्रतिक सिंग, तेलंगणातील स्वप्नील देशपांडे, उत्तर प्रदेशातील शाश्वत मिश्रा ही मुले विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरली; तर पंजाबमधील जशनप्रीत कौर, उत्तर प्रदेशातील इस्तुती अवस्थी आणि पंजाबमधील आकृती कौशल या विद्यार्थिंनीमध्ये राष्ट्रीय स्तरावर अव्वल आल्या.
शालेय मुलांसाठी फिट इंडिया नॅशनल फिटनेस अँड स्पोर्ट्स प्रश्नमंजूषेची दुसरी आवृत्ती गेल्या वर्षी २९ ऑगस्ट रोजी केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा आणि माहिती व प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर तसेच, युवा व्यवहार व क्रीडा आणि गृह राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांच्या हस्ते सुरू करण्यात आली . यावेळी केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री, धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.
प्रश्नमंजूषेच्या दुसऱ्या आवृत्तीला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. भारतातील 702 जिल्ह्यांतील 16,702 शाळांमधील 61,981 विद्यार्थ्यांनी या प्रश्नमंजूषेमध्ये सहभाग नोंदवला. या आधीच्या म्हणजे फिट इंडिया प्रश्नमंजूषेच्या पहिल्या आवृत्तीत 13,502 शाळांमधील एकूण 36,299 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. फिट इंडिया प्रश्नमंजूषा 2022 च्या प्राथमिक फेरीत सर्वाधिक प्रतिनिधित्व उत्तर प्रदेश राज्यातून होते. या राज्यातून एकूण 5368 शाळांमधील 20,470 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. तर उत्तर प्रदेशपाठोपाठ गुजरात आणि मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो.
एनटीए म्हणजेच राष्ट्रीय चाचणी संस्थेने 8 आणि 9 डिसेंबर 2022 रोजी प्राथमिक फेऱ्या घेतल्या. याच एनटीए - नॅशनल टेस्टिंग एजन्सी संस्थेमार्फत आयआयटी आणि जेईई प्रवेश परीक्षा आयोजित केली जाते. या फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातून किंवा शाळेतून मोबाइल-आधारित बहुपर्यायी ऑनलाइन प्रश्नमंजूषेत सहभागी होता येते.
या प्रश्नमंजूषेतून विद्यार्थी आणि शाळांना एकूण 3.25 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख बक्षिसे जिंकण्याची संधी दिली आहे. फिट इंडिया प्रश्नमंजूषा देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना क्रीडा आणि तंदुरूस्तीमधील त्यांचे ज्ञान प्रदर्शित करण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ आहे. तसेच या प्रश्नमंजूषेचे प्रसारण राष्ट्रीय वाहिनी दूरदर्शनवरून करण्यात येणार आहे.
प्राथमिक फेरीच्या निकालांच्या घोषणेनंतर, आता फिट इंडिया प्रश्नमंजूषा 2022 ची पुढची फेरी एप्रिल 2023 मध्ये होणार आहे. यामध्ये 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील एकूण 348 संघ आपापल्या राज्यातील/केंद्रशासित प्रदेशातील विजेता बनविण्यासाठी स्पर्धा खेळतील. 36 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील विजेते, जून 2023 मध्ये नियोजित असलेल्या राष्ट्रीय अंतिम स्पर्धेमध्ये येतील.
S.Kulkarni/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1899909)
Visitor Counter : 190