संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2023-24 च्या भरतीसाठी (अग्नीवीर) भरती मेळावा

Posted On: 16 FEB 2023 5:24PM by PIB Mumbai

मुंबई, 16 फेब्रुवारी  2023

भारतीय सैन्यात 2023-24 या वर्षासाठी अग्निवीर भरतीकरता मुंबईतील लष्कर भरती कार्यालयाने www.joinindianarmy.nic.in. वर अधिसूचना प्रकाशित केली आहे. ऑनलाइन नोंदणी 16 फेब्रुवारी 2023 पासून सुरू झाली आहे. नोंदणी खिडकी (ऑनलाइन) 15 मार्च 2023 रोजी 2359 वाजता बंद होईल.

भरती वर्ष 2023-24 साठी, अग्निवीरांची भरती दोन टप्प्यांत केली जाईल. टप्पा I (ऑनलाइन संगणक आधारित लेखी परीक्षा) आणि दुसरा टप्पा (भरती मेळावा).  महाराष्ट्रातील तरुणांसाठी रोजगार निर्माण करणे आणि त्यांना भारतीय सैन्याचा एक भाग म्हणून मातृभूमीची सेवा करण्याची, सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी देणे हे या भरती मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट

आहे. अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर तंत्रज्ञ, अग्निवीर ट्रेड्समन (10वी पास) आणि अग्निवीर ट्रेड्समन (8वी पास) श्रेणींसाठी भरती आयोजित केली जात आहे.  महाराष्ट्रातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, नंदुरबार आणि धुळे या आठ जिल्ह्यांचे रहिवाशी असलेल्या उमेदवारांसाठी हा मेळावा लागू आहे.  उमेदवारांना भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.  यशस्वीरित्या ऑनलाइन नोंदणी केलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे त्यांच्या ई-मेल आयडीवर पाठवली जातील.

महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तारखेनुसार आणि वेळेनुसार ऑनलाइन संगणक-आधारित परीक्षा (ऑनलाइन सीईई ) घेतली जाईल.  ऑनलाइन परीक्षा 17 एप्रिलपासून घेण्यात येणार आहे.  सीईई ची गुणवत्ता यादी मे 2023 मध्ये संकेतस्थळावर घोषित केली जाईल. त्यानंतर यशस्वी उमेदवार नमूद केलेल्या भरती मेळाव्याला नमूद वेळेत उपस्थित राहतील. शारीरिक चाचण्या आणि वैद्यकीय तपासणी ठिकाणाचा तपशील 'रॅली अॅडमिट कार्ड' (नंतर जारी केला जाईल) मध्ये सूचित केला जाईल.  अंतिम गुणवत्ता यादीत निवड झालेल्या उमेदवारांना त्यानंतर राष्ट्रसेवेसाठी अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी बोलावले जाईल.

एवढ्या मोठ्या प्रमाणावरील उमेदवारांच्या व्यवस्थापनासाठी तपशीलवार नियोजन आणि प्रत्यक्ष अचूक अंमलबजावणी आवश्यक आहे.  यासाठी, राज्य/जिल्हा स्तरावरील सरकारी संस्था नेहमीच तत्पर असतात आणि आवश्यक ते सहाय्य आणि आवश्यक पायाभूत सुविधा पुरवतात.  या जिल्ह्यांतील तरुणांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी सरकारी अधिकारी आणि स्थानिक माध्यमांनी विशेष भर देणे आवश्यक आहे. उमेदवारांना इंटरनेटवर नोंदणी करताना योग्य प्रक्रियेचे पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यांनी त्यांचे तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या सूचनांनुसार अनिवार्य शपथपत्रासह (योग्यरित्या नोटरीकृत) साक्षांकित छायाप्रतीनिशी सर्व आवश्यक मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे मेळाव्याच्या ठिकाणी घेऊन जावीत.  उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या हितासाठी  मूलभूत वैद्यकीय पूर्व तपासणी करणे आवश्यक आहे. मेळाव्याच्या ठिकाणी येण्यापूर्वी कोणत्याही किरकोळ वैद्यकीय स्थिती जसे की कानात मळ असणे इ. दूर करणे आवश्यक आहे.  या कृतींमुळे ऑनलाइन सीईई आणि भरती मेळाव्यात तरुणांचा सुलभ सहभाग शक्य होईल. सर्व उमेदवारांनी फसव्या मध्यस्थांना बळी पडू नये असा सल्ला लष्करी अधिकाऱ्यांनी द
दिला
आहे. कारण संपूर्ण भरती प्रक्रिया अत्यंत निष्पक्ष, पारदर्शक आणि स्वयंचलित आहे.  कोणत्याही उमेदवाराशी संपर्क साधणाऱ्या कोणत्याही मध्यस्थाला लष्करी अधिकारी/पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे.  कोणत्याही प्रश्नांसाठी उमेदवार www.joinindianarmy.nic.in. वर क्वेरी पोर्टल वापरू शकतात किंवा 022-22153510 (ARO Mumbai Enquiry) वर संपर्क साधू शकतात.


S.Kulkarni/V.Ghode/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1899865) Visitor Counter : 364


Read this release in: English